राहुरी पोटनिवडणूकीत अक्षय कर्डीले यांची कुस्ती कोणा बरोबर

राहुरीत राजकीय  पोटनिवडणुकीत अक्षय कर्डीले यांची कुस्ती कोणाशी, याकडे लक्ष
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
 राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून अक्षरशः ‘यात्रेचा’ माहोल पाहायला मिळत आहे. एकीकडे नामवंत पहिलवानांच्या कुस्त्यांची चर्चा रंगत असताना, ऐनवेळेस रेवड्या वरची कुस्ती होते की काय 
दुसरीकडे राजकीय आखाड्यात कोण कोणासमोर उभे राहणार याची उत्सुकता  आहे.
या निवडणुकीत रंगत वाढत असताना भारतीय जनता पक्षाकडून ही लढत शेवटपर्यंत कशी सोपी करता येईल, याबाबत रणनीती आखली जात असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी इच्छुक उमेदवार तथा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या नेत्यांमध्ये बंद दाराआड सविस्तर चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार का आणि त्यांचा अधिकृत उमेदवार कोण असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण कायम आहे. दुसरीकडे भाजपाचे युवा नेते अक्षय कर्डीले यांनी अत्ताच आपला उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढवणार अण गुलाल घेणार हा निर्धार स्पष्ट केला आहे.
यामुळे आता राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतील खरी ‘कुस्ती’ नेमकी कोणामध्ये रंगणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्याची राजकीय घडामोडी पाहता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आल्याचे स्पष्ट दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर