राहुरीत अक्षयतृत्तेयला प्रचार शिगेला आमदारकी कुणाच्या गळ्यात
राजरंग।शिवाजी घाडगे
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक ही केवळ एका जागेची लढत राहिलेली नाही, तर ती स्थानिक राजकारणातील बदलत्या प्रवाहांची आणि मतदारांच्या परिपक्वतेची कसोटी ठरत आहे. अक्षयतृत्तेच्या मुहूर्तावर वेग घेतलेल्या प्रचारातून विविध पक्ष आणि उमेदवार आपापल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.
अक्षयतृत्तेला अक्षयचा राहुरी विधान संभा गड सर करण्या साठी प्रचार आघाडी प्रचारधारा हिंदुत्वाची प्रेरणा कर्डीले साहेबाची नारा देत भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डीले यांनी राहुरी विधानसंभा पोटनिवडणूक प्रचारात आघाडी घेतली असून राष्ट्रवादीचे गोविंद मोकाटे यांनी आपला प्रचार झझावत ठेवला असून वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके आपण कामाचा माणूस असल्याचे सांगत प्रचार करत आहेत शेतीचे पाणी, बेरोजगारी, बंद पडलेला साखर कारखाना यावर भर आहे
तर अपक्ष रावसाहेब खेवरे यांनी कशा साठी तालुक्यांच्या विकासा साठी म्हणत मतदारांना हाक देत अभी नही तो कभी नही ची हाक दिली आहे
याशिवाय महेश हापसे यांनी किटली गळ्यात व सायकलवर फिरुन आपले म्हणणे मतदारांना पटवून देत असुन अर्थव म्हसे व सुर्यभान लांबे मतदार पर्यत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत एकदरीत सात उमेदवार राहुरी पोटनिवडणूक आपले नशीब आजमावत आहेत तस सात हा अकडा कोणाला सात देणार...
तशी पोटनिवडणूक असल्याने मोठ मोठ्या जाहीर सभा ऐवजी गाव भेटी व चौक मिटींग होताना दिसतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार, याच्या प्रचार संभा सोमवारी होणार असल्या तरी प्रत्यक्षात उन्हा मुळे अथवा मतदार मतदान केंद्रांवर आणून मतदान करून घेण्यात जो यशस्वी होईल तोच आपला झेंडा विधानसंभेवर फडकु शकेल तसे अक्षय कर्डीले, अर्थव म्हसे, महेश हापसे हे तिशीच्या आतील उमेदवार आहेत अगदीच लवकर ते विधानसंभा निवडणूक लढवत आहेत अक्षय याच्या मागे भाजपा सारखा केंद्रात व राज्यात सत्ता असणारा भाजपा सारखा भक्कम पक्ष पाठीशी असल्याने व खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी दिल्याने अक्षय फार्मात आहेत दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांची पेरणा घेऊन वाटचाल करीत आहेत तसेच अर्थव म्हसे हे कायद्याचे शिक्षण घेऊन आले व आपल्या कायदेशीर ज्ञानाचा उपयोग जनतेला व्हावा म्हणून प्रचार करत असुन त्यांनी काॅगेस कडे उमेदवारी मागितली होती
महेश हापसे यांनी शैक्षणिक राहुरी पिच्छाडीवर असून शैक्षणिक विकासात सत्ता उपभोगणारानी खोडा घातला असून रामा बरोबर तरुणांना कामाची गरज असल्यची अपेक्षा व्यकत करीत आपला प्रचार सुरु ठेवला आहे
राष्ट्रवादीची शरद पवार गटाकडून उभे असलेले गोविंद मोकाटे याची डाॅक्टर कन्या भाग्यश्री आपल्या बापाचे भाग्य उजाळण्या साठी सरवल्या आहेत त्यांच्या साठी स्टार प्रचारक असून याचा येथेच क्षय करा करा म्हणत देवाच्या भरवशावर महिला सुरक्षित नसल्याचा सांगत सुटल्यात
अलिकडेच केंद्रात सरकार दिलीमिटेशन म्हणजेच लोकसभेतील जागांची पुनर्रचना करणार होते ते विधेयक नामंजूर झाले असून याचा प्रचार देखील होत आहे
एकंदरीत राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकी साठी गुरुवारी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे
3 लाख 33 हजार 545 मतदार असून 1 लाख 72 हजार पुरुष 1 लाख 61 हजार 312 महिला मतदार तृत्तीयपंथी 02 मतदार आहेत
4 मेला कमळाची कमाल की तुतारीचा आवाज निकालानंतर समजेल तो पर्यत तू तू मै मै सुरु आहे.
Comments
Post a Comment