दादा होणार राहुरीचा आमदार पण कोणता
दादा होणार राहुरीचा आमदार
घाडगे न्यूज।विषेश प्रतिनिधी
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात आता हळूहळू चांगलाच रंग भरू लागला आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणारी निवडणूक काँग्रेस, शिवसेना व वंचित बहुजन आघाडी आपले उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर तसेच अपक्ष देखील आहेच
तशी ही जागा राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडे असून महाविकास आघाडी आपापले स्वतंत्र उमेदवार खरोखर देणार का आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) कोणाला उमेदवारी देणार, याबाबत चर्चा सुरू आहे. भाजपाचे अक्षय दादा कर्डीले व प्राजक्त दादा तनपुरे याच्यात ही लढत होणार असल्याचे चित्र असून नेमका कोणता दादा आमदार होणार हे निकालानंतर स्पष्ट होईल .
खासदार निलेश लंके यांनी आपण माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या बरोबर उमेदवारी संदर्भात बोलणार असल्याचे सांगितले असून योग्य वेळी योग्य डाव ची आखत आहे तर दुसरीकडे काँग्रेसचे निरीक्षक नगर जिल्हा दौऱ्यावर असून निवडणुकी संदर्भात खलबत सुरू आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) देखील इच्छुक आहेत. असे असले तरी खरी लढत कशी होणार
भाजपाचे अक्षय कर्डीले व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यात होण्याची शक्यता बोलली जात असली तरी उमेदवारी अर्ज घेऊन जाणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे
तशी ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रयत्न केले. पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देखील मुंबईत बोलावून प्रयत्न केले. असे असताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपण कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर निवडणूक लढविणार असल्याचे सूचित केले. ६ एप्रिल हा उमेदवारी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिवस असून सर्व चित्र उमेदवारी व पक्ष याबाबत स्पष्ट होईल.
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक ही अत्यंत वेगळ्या मोडवर येऊन ठेपली असून सहानुभूती व एकंदरीत विस्कटलेली राजकीय परिस्थिती याचा परिणाम दिसून येत आहे. माजी दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्याकडून ही जागा राष्ट्रवादीकडे गेली होती, ती त्यांनी राजकीय डावपेच टाकत पुन्हा मिळवली होती.
Comments
Post a Comment