बारामती पोटनिवडणूकी साठी काॅगेस केला उमेदवार जाहीर
घाडगे न्यूज।विषेश प्रतिनिधी
बारामती विधानसभा मतदारसंघातील होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला असून ॲड. आकाश विजय मोरे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. या घोषणेमुळे बारामतीच्या राजकीय वातावरणात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे.
काँग्रेसने राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्या विरोधात उमेदवार उभा केल्याने या मतदारसंघात थेट आणि चुरशीची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पारंपरिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीत काँग्रेसने उमेदवार देत आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
दरम्यान, या पोटनिवडणुकीकडे राज्यभराचे लक्ष लागले असून विविध पक्षांकडून प्रचाराची रणधुमाळी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उमेदवार ॲड. आकाश मोरे यांना स्थानिक पातळीवर कितपत पाठबळ मिळते, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणता उमेदवार मैदानात उतरतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
एकंदरीतच, बारामती पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची लढत ठरण्याची चिन्हे असून आगामी काळात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment