राहुरी विधानसंभा पोटनिवडणूकी साठी प्रशासन सज्ज
घाडगे न्यूज।प्रतिनिधी
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक येत्या २३ एप्रिल रोजी पार पडणार असून, निवडणुकीसाठीची सर्व प्रशासकीय तयारी अंतिम टप्प्यात पूर्ण झाली आहे.3 लाख 33हजार 545 मतदार आपला मताचा हक्क बजावणार आहेत.
शासन स्तरावर आवश्यक नियोजन करण्यात आले असून निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. तसेच प्रत्यक्ष मतदानासाठी लागणाऱ्या मतपत्रिका आणि पोस्टल मतपत्रिकांची छपाईही पूर्ण करण्यात आली आहे.
ही निवडणूक पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत वातावरणात पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. त्यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मतदान प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
राहुरी पनिवडणूक साठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनुपसिंह यादव हे असुन निवडणूकी साठी
एकूण बुध, मतदान केंद्र -374 आहेत एकूण मतदान-333545
परुष मतदार 172231, स्त्री मतदार -161312, इतर -02 आहेत
दरम्यान, राजकीय वातावरणही हळूहळू तापू लागले आहे. सुरुवातीला प्रचार काहीसा मंदावलेला असला, तरी आता विविध पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांच्या याद्या जाहीर करत प्रचाराला गती दिली आहे. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अपक्ष असे एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, मतदारांचा कौल मिळवण्यासाठी सर्वच उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
एकूणच, प्रशासनाची काटेकोर तयारी आणि राजकीय पक्षांचा वाढता प्रचार यामुळे राहुरीतील ही पोटनिवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Comments
Post a Comment