माजी मंत्री प्राजक्त तनपुरे राहुरी पोटनिवडणूक लढणार....

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे नामनिर्देशनपत्र दाखल करणार मात्र पक्ष की अपक्ष हे गुलदस्त्यात 
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारी करणार असले तरी पक्ष की अपक्ष सस्पेन्स अखेरपर्यंत कायम राहिल्याने शेवट पर्यंत तनपुरे यांनी विरोधकांना कोड्यात ठेवले असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे
  विकासाच्या दृष्टीने कोणत्याही पक्षाची वाट न पाहता अपक्ष उमेदवारी स्वीकारावी, असा सुर होता ही निवडणूक कार्यकर्ते स्वतःच्या जोरावर लढवतील, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावर उत्तर देताना प्राजक्त तनपुरे यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्या भाषणात म्हटले की, विद्यमान आमदारांच्या दुःखद निधनामुळे ही निवडणूक होत असून परिस्थिती भावनिक आहे. मात्र, मतदारसंघाच्या भवितव्याचा विचार करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. “उद्या सकाळपर्यंत आपण निर्णय जाहीर करू. निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने आपणही अर्ज भरू,” असे सूचक विधान करत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला. तसेच, कार्यकर्त्यांनी कोणतीही शंका बाळगू नये, असे आश्वासनही त्यांनी दिले.
राहुरी, नगर आणि पाथर्डी तालुक्यांतील मोठ्या संख्येने तनपुरे समर्थक या वेळी उपस्थित होते. त्यांच्या आजच्या वक्तव्यामुळे उमेदवारीबाबतचा सस्पेन्स किमान उद्यापर्यंत तरी कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेमुळे आणि त्यांनी ठेवलेल्या सस्पेन्समुळे राजकारणातील ‘चाणक्यनीती’ची झलक दिसून आल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर