भारय रत्न डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

राहुरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; युवक व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राहुरी शहरात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असून या मिरवणुकीला युवक, महिला तसेच भीमसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली आहे. संपूर्ण परिसर ‘जय भीम’च्या घोषणांनी दुमदुमून गेला असून वातावरण अत्यंत उत्साही व चैतन्यमय झाले आहे.
या मिरवणुकीत विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि युवक मंडळांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, तसेच आकर्षक देखावे यामुळे मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरत आहे. महिलांचा उत्स्फूर्त सहभागही विशेष लक्षवेधी ठरत आहे.
रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आरपीआय)चे तालुका अध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आंबेडकर अनुयायांच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करण्यात येत असून नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आहे.
दरम्यान, मिरवणुकीच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्त आवश्यक तेवढा नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला प्रशासन जबाबदार असल्याचे जाहीर केल्यानंतर नंतर  आजुबाजुला असलेले बंदोबस्तील पोलीस कर्मचाऱ्या कानात कापसाचे बोळे घालून आल्याचे चित्र होते तर दुसरीकडे भीम गीतावर युवक व महिला नृत्य करीत आनदात न्हाऊन गेले होते 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर