जैसी करणी वैसी भरणी भोगू अशोक खरात वर काळाचा आसूड

जैसी करणी वैसी भरणी; स्वयंघोषित ‘कॅप्टन’वर काळाचा आसूड 
 श्रध्देचा बाजार।शिवाजी घाडगे 
नाशिक येथील स्वयंघोषित “कॅप्टन” म्हणून चर्चेत आलेला अशोक खरात  सध्या विविध गुन्हे, चौकशी आणि प्रकृतीच्या समस्यांमुळे अडचणीत सापडला आहे. एकेकाळी मोठेपणाचा आव आणत फिरणाऱ्या या व्यक्तीवर आता काळानेच उलट वार करून आसूड ओढला असल्याची 
चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. “जैसी करणी वैसी भरणी” अशीच प्रतिक्रिया सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात सध्या  शिर्डी पोलीस ठाण्यात तो पोलीस कोठडीत असून  पुन्हा नाशिक पोलिस त्याचा ताबा घेवु शकतात . एका हाताला लकवा झाल्याने त्याची प्रकृती खालावली असून रक्तदाब व शुगरसाठी उपचार सुरू आहेत.
एकेकाळी मोठ्या थाटामाटात फिरणाऱ्या अशोक खरात याला आता न्यायालयीन आणि वैद्यकीय संकटांचा सामना करावा लागत आहे. त्याची वेळ घेऊन भोळे भाबडे भक्त आपल्याला गुण येईल या आशेवर असायची आता मात्र खरातची शिर्डी पोलीसांनी वरात काढली असून खरातची वेळ खराब असून तो देखील आता याचना करीत असुन त्याला दिवसा चांदण्या दिसत आहेत. 
राहाता न्यायालयात  सुनावणी दरम्यान त्याला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असली तरी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, शिर्डी परिसरात त्याचे समर्थक आणि सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे अनेक जण आता शांत झाले असले तरी शिर्डीच्या जेल मध्ये कैद असलेल्या अशोक खरात शोक करीत असुन एक हात हालत असल्याने त्याची हालत खराब आहे 
या सर्व घडामोडींमुळे परिसरात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान एका डॉक्टर दाम्पत्याच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूचीही चर्चा सुरू आहे. मानसिक तणाव आणि बदनामी सहन न झाल्याने समोरच्या वाहनाला धडक दिल्याची चर्चा होत असून या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले, तर त्यांचा मुलगा अद्याप उपचार घेत असल्याची माहिती आहे.
सत्तेचा, पैशाचा आणि प्रभावाचा गर्व कितीही मोठा असला तरी काळाच्या न्यायापुढे सर्वांनाच उत्तर द्यावे लागते, याचीच चर्चा आता सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर