नाशिक पोलिस महानिरीक्षक दत्ता कराळे पिच्छे मूड
राज्यातील २४ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले असून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्ता कराळे यांच्या बदलीची सर्वाधिक चर्चा रंगली आहे. कराळे यांची राज्य मानवी हक्क आयोगात विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रवीण पडवळ यांची नाशिक परिक्षेत्राच्या आयजीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दत्ता कराळे यांच्या सेवानिवृत्तीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच ही बदली करण्यात आल्याने राजकीय तसेच पोलीस वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियमित प्रशासकीय बदल्यांचा भाग म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात असले, तरी काही अलीकडील घडामोडींमुळे या बदल्येला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यापूर्वी अशोक खरात प्रकरणात दत्ता कराळे यांचे कथित संबंध असल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केल्यानंतर कराळे यांच्या बदलीकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. त्यामुळे या निर्णयामागे केवळ प्रशासकीय कारणे आहेत की अन्य काही राजकीय व अंतर्गत घडामोडी, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, नाशिक परिक्षेत्राच्या आयजीपदी दत्ता कराळे यांची नियुक्तीही यापूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. तत्कालीन आयजी डॉ. बी. जी. शेखर यांच्या बदलीनंतर कराळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, शेखर यांनी केंद्रीय प्रशासकीय लवादात धाव घेतल्यानंतर ती बदली रद्द करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. शेखर यांच्या सेवानिवृत्तीनंतर कराळे यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली होती.
आता स्वतः कराळे यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीच त्यांची बदली झाल्याने या प्रकरणातील चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षेत्रातील या बदल्याकडे विशेष लक्ष लागले असून आगामी काळात याबाबत आणखी राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्याचे गृहमंत्र्यानी जिल्हा पोलीस अधीक्षक व आता २४ पोलीस आय पी एस अधिकाऱ्याच्या बदल्या करताना आगामी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील हा हेतु ठेवून बदल्या केल्या असून यामुळेच काही आपला हेतूला छेद देऊन त्यांची जागा दाखवून दिल्याने पित्त खवळल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात असून
नाशिकला आगामी कुभ भरत असल्याने नाशिक केंद्र स्थानी आहे
Comments
Post a Comment