कणगर येथे वाघाचा बबन कदम यांच्यावर हल्ला
राहुरी तालुक्यातील कणगर परिसरात शुक्रवारी रात्री वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात बबन कदम हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कणगर येथील तांभेरे, वरघुडे व शेटे वस्ती परिसरात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. बबन कदम हे परिसरातून जात असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. हल्ल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा करत मदतीस धाव घेतली. त्यानंतर जखमी अवस्थेत कदम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर कणगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच शेतात किंवा मोकळ्या परिसरात एकटे जाणे टाळावे, असे आवाहन
कणगरचे संरपंच सर्जेराव घाडगे यांनी केले आहे
वाघाचा वावर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परिसरात सतर्कता वाढवली असून नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment