छत्रपती शिवाजी महाराज विटबखोर माहीती देणाऱ्यास 11 हजाराचा इनाम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्याचा शोध सुरू; माहिती देणाऱ्यास ११ हजारांचे बक्षीस
घाडगे न्यूज।प्रतिनिधी 
राहुरी शहरातील बुवासिंग बाबा तालीम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी राहुरी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू ठेवली आहे. या प्रकरणातील आरोपीबाबत खात्रीलायक माहिती देऊन त्याला पकडण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीस ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
सुमारे दीड वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे राहुरी शहरासह परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नागरिकांच्या मनात असलेला आदर लक्षात घेता या घटनेला अत्यंत गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते. त्यानंतर राहुरी पोलिसांनी विविध स्तरांवर तपास सुरू केला. मात्र, दीड वर्षांचा कालावधी उलटूनही विटंबना करणारा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांनी नागरिकांचे सहकार्य मिळावे यासाठी आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपीची ओळख, त्याच्या हालचाली किंवा घटनेशी संबंधित कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल. नागरिकांच्या सहकार्यामुळे या प्रकरणाचा छडा लावणे शक्य होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत असून, आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज विटंबना प्रकरणी तपास नसल्याने नागरिकांकडून  नाराजी व्यक्त करण्यात येत आहे 

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन