पत्रकार सुधाकर कराळे यांचा ७१व्या वाढदिवसानिमित्त सत्कार

ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस तसेच जलनायक व पत्रकार शिवाजी घाडगे यांनी कराळे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ अंतः अस्ति प्रारंभ’ हे पुस्तक भेट देऊन सत्कार केला 
 सुधाकर कराळे यांनी शेतकरी, कष्ट करी शोषित  घटक तसेच ग्रामीण विकासा साठी लेखन केले 
 पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक वर्षे निस्वार्थपणे कार्य करत समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांच्या प्रामाणिक, निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारितेचा गौरव म्हणून हा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कराळे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना निरोगी, दीर्घायुषी आणि सुखसमृद्ध जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात पत्रकारिता, समाजसेवा आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी कराळे यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. ७१ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या सत्कारामुळे कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन