जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका राहुरीत

 पोलीस अधीक्षक राहुरीत गणेश मंडळांशी साधणार हितगुज

घाडगे न्यूज। प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा कायम राखून साजरा करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका हे सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) राहुरीत  येणार आहेत. यावेळी ते गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेणार आहेत.
सोमवारी सकाळी १०.३० वाजता राहुरी नगरपरिषदेच्या सभागृहात गणेश मंडळांच्या अध्यक्षांची तसेच शांतता समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका मार्गदर्शन करणार असून, गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, मिरवणुकीचे नियोजन, ध्वनिक्षेपकाचा वापर, मंडप उभारणी, वीज व अग्निसुरक्षा तसेच सामाजिक सलोखा याबाबत आवश्यक सूचना करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सव हा सर्व समाजाला एकत्र आणणारा उत्सव असल्याने उत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही या बैठकीत करण्यात येणार आहे. तसेच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या विविध अडचणी, परवानग्या, मिरवणुकीचे मार्ग, वाहतूक व्यवस्था आणि इतर स्थानिक प्रश्न पोलीस प्रशासनाकडून जाणून घेण्यात येणार आहेत.
‘पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळे यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.’ उत्सवाच्या काळात नागरिकांची सुरक्षितता, शांतता आणि सुव्यवस्था यांना सर्वोच्च प्राधान्य देत गणेशोत्सव आनंदात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या बैठकीस राहुरी शहर व परिसरातील गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच शांतता समितीच्या सदस्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधितांनी वेळेत उपस्थित राहून बैठकीत आपल्या सूचना व समस्या मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन