गणेशोत्सव आनंदासोबत सामाजिक बांधिलकी जपणारा-जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका
गणेशोत्सव आनंदासोबत सामाजिक बांधिलकी जपणारा ; जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका घाडगे न्यूज| प्रतिनिधी गणेशोत्सव हा आनंद, उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचा सर्वांनी मनमुराद आनंद घ्यावा; मात्र हा आनंद इतरांना त्रासदायक ठरणार नाही, याचीही काळजी घ्यावी. गणेशोत्सवात डीजेचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांनी उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. तसेच ‘नशामुक्त अहिल्यानगर’ या अभियानाचा प्रचार व प्रसार करून तरुणाईला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांनी केले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी राहुरी येथे गणेश मंडळांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शांतता समितीचे सदस्य, प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गणेशोत्सव काळात कायदा-सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, ध्वनिप्रदूषण, विसर्जन मिरवणूक आणि सामाजिक सलोखा यासंदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याव...