कुलगुरु डॉ पी जी पाटील होणार कर्नल

महात्मा फुले कृषी विद्यापीठचे 
कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील होणार कर्नल

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना केंद्र सरकारच्या संरक्षण विभागातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने मानद कर्नलपद प्रदान करण्यात येणार आहे. मंगळवारी  2 मे, 2023 रोजी विद्यापीठात होणार्या दिमाखदार सोहळ्यात अतिरिक्त महासंचालक, मेजर जनरल वाय.पी. खांदुरी यांच्या हस्ते कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना बॅटन, सन्मानपत्र व कर्नलपद प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी औरंगाबाद येथील ग्रुप कमांडर ब्रिगेडीअर यु.के. ओझा, अहमदनगर कॅन्टॉमेन्ट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे, अहमदनगर 17 महाराष्ट्रीयन बटालीयनचे कमांडींग ऑफिसर कर्नल चेतन गुरबॅक्स, विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. बापुसाहेब भाकरे, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, कुलसचिव प्रमोद लहाळे,  नियंत्रक विजय पाटील, लेफ्ट. सुनिल फुलसावंगे उपस्थित असणार आहेत. या कृषि विद्यापीठातील हे पाचवे कुलगुरु आहेत ज्यांना कर्नलपदाने सन्मानीत करण्यात येणार आहे अशी माहिती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार यांनी दिली. 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार