Posts

Showing posts with the label एन सी सी

कुलगुरू पाटील झाले कर्नल

Image
कुलगुरु पाटील कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील मानद कर्नलपदाने सन्मानित महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना केंद्र सरकारच्या संरक्षण विभागातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने प्रतिष्ठेचे समजले जाणारे मानद कर्नलपद प्रदान करण्यात आले. विद्यापीठाच्या डॉ. नानासाहेब पवार सभागृहात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात औरंगाबाद विभागाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडीअर उमेशकुमार ओझा यांचे हस्ते कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांना बॅटन व सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. तसेच कुलगुरु यांना कर्नलपदाची विधीवत वस्त्रे परिधान करण्यात आली. या विद्यापीठातील कुलगुरुंना सलग चार वेळा अशा प्रकारची पदवी देऊन गौरविण्यात आले. आजपर्यंत कृषि विद्यापीठाच्या सहकार्याने राष्ट्रीय छात्र सेनेची जिल्हास्तरीय 10 शिबीरे व 1 राष्ट्रीय एकात्मता शिबीर घेण्यात आली आहेत. यावेळी कर्नल पी.जी. पाटील आपल्या भाषणात म्हणाले की मी माझ्या कॉलेज जीवनात एन.सी.सी.चा विद्यार्थी राहिलेलो असून एन.सी.सी. ने माझ्या जीवनात शिस्त, समता व देशभक्ती हे गुण रुजविले. एन.सी.सी. हे देशातील सर्वात मोठे व उज्वल असे संघटन असून त्यामुळे युवकांम...