दादा...हा डाव नियतीने जिंकून नेला राव
दादा… हा डाव नियतीने जिंकून नेला राव! राहुरी घाडगे न्यूज। शिवाजी घाडगे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात झालेले निधन ही केवळ एक दुर्घटना नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकीय आणि भावनिक इतिहासावर पडलेली खोल जखम आहे. “पायलटला रनवे न सापडला” हे कारण कागदावर पुरेसे असू शकते; पण जनतेच्या मनाला आजही हा अपघात पटत नाही. कारण काही व्यक्ती अपघातात जात नाहीत—त्या अचानक हिरावून घेतल्या जातात. दादा त्यातलेच होते. दादांच्या अंत्यदर्शनासाठी उसळलेला जनसागर हा कोणत्याही सरकारी आदेशाचा परिणाम नव्हता. तो होता जनतेच्या मनातून उसळलेला आक्रोश. ग्रामीण महाराष्ट्राचा हा डॅशिंग, तडफदार आणि थेट बोलणारा नेता किती खोलवर रुजला होता, हे त्या अश्रूंनीच सांगितलं. दादा लोकप्रिय नव्हते, दादा लोकांच्या आयुष्याचा भाग होते. ते हजरजबाबी होते, पण जखम देणारे नव्हते. कडवे होते, पण क्रूर नव्हते. सत्ता त्यांच्या हाती आली, पण अहंकार कधीच आला नाही. मिळालेल्या प्रत्येक संधीचा त्यांनी स्वतःसाठी नव्हे, तर जनतेसाठी वापर केला. दादांचा पहिला पहाटचा शपथविधी जसा अविश्वसनीय वाटला होता, तसाच आज त्यां...