अतिक्रमणाची हौस कोणाला !
अतिक्रमणाची हौस कोणाला ! विशेष @पत्रकार शिवाजी घाडगे संध्या जिल्हयातील काही तालुक्यात अतिक्रमण विरोधात मोहीम जोरात चालु आहे कदाचित अतिक्रमण असेल तर निघाले पाहीजे मात्र त्यांना पर्यायी जागा सुध्दा दिली पाहीजे. हे व्यावसायिक अथवा रहानारे बेघर होणार नाही यांची काळजी देखील प्रशासनाने घ्यायला हवी कदाचित काही अतिक्रमण शासनाने नियमित केले मात्र त्याची तशी नोंद शासन दरबारी नसेल तर दोष कोणाचा. बर हे अतिक्रमण झाले याची खबर तुमच्या कार्यालया या आगोदर दिसली नाही का दिसली असेल तर तशी नोटीस बजावली का एक तर तुम्ही लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकत नाहीत व लोक करतात त्यांना रोजगार करु देत नाहीत अथवा तुम्ही घरे देऊ शकत नाहीत अथवा लोकांनी बाधले त्यात राहु देत नाहीत. महागाई प्रचंड प्रमाणात वाढलेली असताना पै पै करून गरिबाने कुडाचे अथवा पत्र्यिचे निवारा केला तो ही तुम्ही जेसीबी काढून टाकला मग त्यांनी राहायचे कुठे शासकीय नापीक अथवा पडीक जागा द्या नाहीतर त्या लोक उद्या तुमच्या कार्यालया समोर बि-हाड माडतील. आता निवडणुका संपल्यात लोकांची आपल्याला गरज नाही असा कोता विचा...