माजी मंत्री प्राजक्त तनपुरे "भगवे" उपरणे काय सुचित करते
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गळ्यातील भगवे उपरणे काय सूचित करते? चर्चा घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या गळ्यातील भगवे उपरणे आणि फोटोमागील भगवा बॅकग्राऊंड सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. नेमके तनपुरे यांच्या मनात काय सुरू आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शुक्रवारी त्यांच्या समर्थकांनी असे फोटो आपल्या मोबाईलचे स्टेटस ठेवले असून, भविष्यात होणाऱ्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या दृष्टीने या भगव्या रंगाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रशासकीय यंत्रणेच्या माहितीनुसार फेब्रुवारी २०२६ नंतर कधीही राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर होऊ शकते. त्यादृष्टीने सध्या मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. मागील विधानसभा निवडणुकीत प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झाला होता. दिवंगत आमदार शिवाजी कर्डीले यांच्या दुर्दैवी निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून, प्राजक्त तनपुरे पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. अलिकडेच त्यांनी राहुरी नगरपालिकेत नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून आणत आपली ताकद दाखवून दिल...