माध्यमावर माझा विश्वास-माजी मंत्री प्राजक्त तनपुरे
मध्यमे समाजातील सर्व घटकाचा आवाज आहेत-माजी मंत्री प्राजक्त तनपुरे राहुरी।प्रतिनिधी माध्यमे समाजातील सर्व स्तरांच्या व्यथा मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करतात. त्यामुळेच आजही पत्रकारांवर समाजाचा विश्वास आहे. याच विश्वासाच्या बळावर लोकशाही भक्कमपणे उभी आहे, असे मत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले. मराठी पत्रकार दिनाच्या औचित्याने राहुरी नगर परिषदेच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यात ते मार्गदर्शन करत होते. यावेळी बोलताना माजी मंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले की, लोकशाहीतील चार स्तंभांपैकी कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळावरचा माझा विश्वास हळूहळू उडत चालला आहे, कारण या ठिकाणी बहुमताच्या जोरावरच निर्णय घेतले जातात. मात्र न्यायपालिका आणि पत्रकारिता या तिसऱ्या व चौथ्या स्तंभावर माझा अजूनही ठाम विश्वास आहे. ते पुढे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात केवळ दूरदर्शन माध्यम होते; मात्र आज मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील असंख्य वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे उपलब्ध आहेत. प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवणारे पत्रकार राहुरीत कार्यरत आहेत, याचा मला अभिमान आहे. समाजा...