Posts

Showing posts with the label राहुरी पंचायत समितीत बैठक

महाराष्ट्र लोकसेवा आयोग हक्काची जागृती करा-आयुक्त चित्रा कुळकर्णी

Image
महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याची जनमानसात व्यापक स्वरूपात जागृती करा- आयुक्त चित्रा कुलकर्णी   -जनतेला पारदर्शकपणे व विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी यासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवत लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.  नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत जनमानसात कायद्याची अधिक व्यापक स्वरूपात जागृती करण्याचे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले.  पंचायत समिती सभागृह, राहुरी येथील बैठकीत त्या बोलत होत्या  यावेळी आयोगाचे उपसचिव सुनिल जोशी, सहायक कक्ष अधिकारी प्रशांत घोडके, महाआयटीचे महाव्यवस्थापक संतोष खैरनार, श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, प्रशांत सिनारे, नायब तहसीलदार संध्या दळवी  आदी उपस्थित होते.     श्रीमती कुलकर्णी म्हणाल्या, जनतेला पारदर्शक, गतीमान आणि दिलेल्या कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन अधिक प्रभावीपणे ऑनलाईन सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा करण्यात आला आहे.  शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यां...