Posts

Showing posts with the label पोलीस सागर दाणी ...

पोलीस दादा करत आहेत वन्यजीवांचे संरक्षण चांदबीबी महाल वर स्वच्छतादूताची भूमिका

Image
पोलीस दादा करत आहेत वन्यजीवांचे संरक्षण; चांदबीबी महालावर स्वच्छता दूताची भूमिकाही पार पाडत आहेत घाडगे न्यूज।प्रतिनिधी  अहिल्यानगर पोलिसांच्या अंतर्गत चांदबीबी महाल परिसरात दळण वळण माहीती तंत्रज्ञान वायरलेस रिपीटर स्टेशन बसविण्यात आले असून येथे पोलीस कर्मचारी सागर दाणी कार्यरत आहेत. मात्र ते केवळ आपल्या कर्तव्यापुरते मर्यादित न राहता, वन्यजीव संरक्षण आणि परिसर स्वच्छतेसाठीही उल्लेखनीय काम करत आहेत. सागर दाणी हे रात्रंदिवस या ठिकाणी तैनात असतात. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत ते वन्य प्राण्यांसाठी पाणवठे तयार करून त्यांची देखभाल करतात. या पाणवठ्यांवर विविध वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येतात. आपल्या अनुभवाबद्दल सांगताना दाणी म्हणाले, “बिबट्याला अत्यंत तीव्र संवेदना असते. एकदा माझ्या समोर बिबट्या आला होता. पाणवठे स्वच्छ करताना त्याच्या विष्ठेची साफसफाईही करावी लागते. त्या वेळी त्याचा वास हाताला येतो, पण हे काम वन्यजीवांसाठी आवश्यक असल्याने मी ते मनापासून करतो.” या परिसरात विविध प्रकारचे सर्पही आढळतात. सागर दाणी यांनी सर्पमित्रांकडून प्रशिक्षण घेऊन साप पकडण्याचे कौशल्य आत्मसा...