आचारसंहिता कडक अमलबजावणी करावी- अरूणकुमार
आचारसंहिता अंमलबजावणी काटेकोर पणे करावी - निवडणूक निरीक्षक अरूणकुमार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा आढावा - आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून कामकाज करावे, अशा सूचना केंद्रीय निवडणूक निरीक्षक अरूण कुमार यांनी दिल्या. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय आणि टाकळीभान येथील भरारी पथकांना भेटीप्रसंगी त्यांनी या सूचना दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे, सहाय्यक निवडणूक अधिकामिलिंद कुमार वाघ, नगरपरिषद मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे आदी उपस्थित होते. यावेळी अरूणकुमार यांनी निवडणुकीचे नोंदणी कार्यालय, स्ट्रॉंग रूम, एमसीसी, कंट्रोल रूम, साहित्य विभाग, कार्यालयात असलेली सीसीटीव्ही आणि आचारसंहिता कक्षाची पाहणी केली. नियंत्रण कक्षाला भेट देऊन आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले. श्रीरामपूर तालुक्याच्या हद्दीमधील टाकळीभान येथील...