देवळालीत वाढीव पाणी पट्टी रद्द करा
देवळाली प्रवरा नगरपालिकेची वाढीव पाणीपट्टी रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय धरणे आंदोलन घाडगे न्यूज।प्रतिनिधी वाढीव पाणीपट्टी रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी देवळाली प्रवरा नगरपालिकेसमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आंदोलकांनी विद्यमान नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. बहुमताच्या जोरावर नगराध्यक्ष शहरावर हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. वाढीव पाणीपट्टीचा निर्णय रद्द केल्यास तुमचा अपमान होणार नाही, उलट जनतेत मान वाढेल, असे आंदोलकांनी नगराध्यक्षांना उद्देशून सांगितले. या आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती आणि अनेक महिलांनी आपले विचारही व्यक्त केले. विद्यमान नगरसेविका सुनीता थोरात यांनी सांगितले की, “आम्ही सत्तेसोबत नाही तर जनतेसोबत आहोत. देवळाली प्रवरा नगरपालिकेत पाणीपट्टी वाढविण्याच्या निर्णयाला आम्ही सुरुवातीपासून विरोध केला होता. सध्या दुष्काळी परिस्थिती आहे, नागरिकांचे उत्पन्न घटले आहे. अशा वेळी ही वाढ सर्वसामान्यांना परवडणारी नाही. विरोधकांना बोलू दिले जात नाही, नगराध्यक्ष मनमानी क...