Posts

Showing posts with the label तुर्तास...

दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरण व राजकीय मर्यादा

Image
दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण व  राजकीय मर्यादा चर्चा घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  सध्या राज्याच्या राजकारणात एकच प्रश्न सातत्याने चर्चेत आहे—दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलिनीकरण होणार का? या महिन्यातच दोन्ही गट एकत्र येणार, अशा खमंग राजकीय चर्चा सुरू आहेत. अशा चर्चा होणे स्वाभाविकही आहे. कारण पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांनी प्रत्यक्षात एकत्र लढत दिली होती. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हयात असताना त्यांच्या ताब्यात असलेल्या या दोन्ही महापालिका हातातून निसटल्याची खंत त्यांना स्वतःलाच होती, हे राजकीय वर्तुळात उघड सत्य आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी पार्थ पवार यांच्या भागीदारीतील एका फर्मकडून करण्यात आलेला आरक्षित जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात आला. त्याचा राजकीय परिणाम जसा व्हायचा होता, तसाच तो झाला. दुसरीकडे, भाजपाने राज्यात सत्तेतील सहकारी म्हणून इतर पक्षांना घेतल्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना सत्तेत थेट सहभागी होता येणार नाही, या भीतीपोटी भाजपाने पुण्यात स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. परिणामी, पुण्यात अजित पवार या...