नगर जिल्ह्य़ात 3 हजार 763 मतदान केंद्र
जिल्ह्यात ३ हजार ७६३ मतदान केंद्रांवर होणार मतदान विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३ हजार ७६३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यातील ७४३ शहरी भागात तर ३ हजार २० ग्रामीण भागात आहेत. पारनेर मतदारसंघात सर्वाधिक ३५४ मतदान केंद्र ग्रामीण भागात असून शेवगाव आणि श्रीगोंदा ३२०, कर्जत जामखेड ३११, अकोले २९४, राहुरी २७५, नेवासा २६१, संगमनेर २३६, शिर्डी २२०, श्रीरामपूर २१५ आणि कोपरगाव मतदारसंघातील २१४ मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. अहमदनगर शहर मतदारसंघात एकही मतदान केंद्र ग्रामीण भागात नसून सर्व २९७ मतदान केंद्र शहरी भागात आहेत. अहमदनगर खालोखाल श्रीरामपूर ९६, कोपरगाव ५८, संगमनेर ५२, शिर्डी ५०, शेवगाव ४८, कर्जत जामखेड ४५, राहुरी ३२, श्रीगोंदा २५, नेवासा १५, अकोले १३ आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात १२ मतदार केंद्र शहरी भागात आहेत. अकोले विधानसभा मतदारसंघात १८३ ठिकाणी केवळ एक मतदान केंद्र असून ३५ ठिकाणी २, तेरा ठिकाणी ३, दोन ठिकाणी प्रत्येकी ४ आणि एका इमारतीत ७ मतदान केंद्र आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघात ७१ ठिकाणी केवळ एक मतदान केंद्र असून ४३ ठिकाणी २, बावीस ठिकाणी...