राहुरी विधान संभेवर भाजपाचे कदम यांचा दावा
उमेदवारी मिळवून देण्याचे अभिवचन मी देतो तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा- माजीआमदार चंद्रशेखर कदम आपण भारतीय जनता पार्टीशी गेल्या तीन पिढ्यांपासून एकनिष्ठ आहोत व पक्षच प्रामाणिक काम करत आहोत, गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्यजित ला राहुरी विधानसभेची उमेदवारी अगदी शेवटच्या क्षणाला नाकारली, तुम्ही सर्व कार्यकर्ते नाराज झाला होता परंतु आपण पक्ष आदेश मानणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे आपण आपला परतीचा उमदेवार निवडून यावा यासाठी गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रामाणिक प्रयत्न केला, तरी देखील आपल्या उमेदवाराचा पराभव झाला, पक्षामध्ये उमेदवारी मागण्याचा अधिकार एक पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना असू शकतो, त्याच आधारावर सत्यजित स्वतःसाठी पक्षाकडे उमेदवारी मागत आहे, यावेळी त्याची कामाची पद्धती, तरुण उमेदवार, नवीन चेहरा व सुशिक्षित उमेदवार या गुणवत्तेवर पक्ष निश्चित सत्यजित ला उमेदवारी देतील यात मला शंका वाटत नाही म्हणून मी तुम्हाला उमेदवारी मिळवून देण्याचे अभिवचन देतो तुम्ही निवडणुकीच्या तयारीला लागा असे देवळाली प्रवराच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मा.आ.चंद्...