सरला बेट विकास आराखड्यास मंजुरी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सरला बेटाच्या विकास आराखड्यास मंजूरी देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महंत गंगागिरी महाराजांच्या अध्यात्मिक परंपरेचा अखंड वारसा लाभलेल्या अनूत श्रध्दाळु भाविक भक्ताचे श्रध्दा स्थान सरला बेट विकास आराख़डा व शनि देवगाव बंधाऱ्यास त्वरीत मंजूरी देऊ,अशी ग्वाव्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी शनि देवगाव येथे दिली. गंगागिरी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताह सांगता झाली. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर चे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सरला बेटाचे अध्यात्मिक महंत रामगिरी महाराज, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,आ. रमेश बोरनारे,आ. विठ्ठल लंघे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, तसेच अन्य अध्यात्मिक, धार्मिक क्षेत्रातील भाविक भक्त उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतून येतांना समुद्राचे दर्शन होते त्याप्रमाणे इथे आल्यावर भाविकांच्या सागराचे दर्शन झाले. १७८ वर्षांची परंपरा असलेला हा अध्यात्मिक सोहळा, भाविकांची शिस्त, तत्परता, त्यांची भाविकता हे सगळं मनाला विलक्षण आनंद देणारे आहे....