Posts

Showing posts from June, 2026

सत्तेत जाणच शाहणपणाच

Image
सत्तेत जाणच शाहणपणाच  राजरंग।शिवाजी घाडगे  सत्ये पुढे शहाणपण चालत नसत अस म्हणतात मात्र सत्तेत सहभागी होण हे देखील शहाणपणाचे नाही का तर याच उत्तर देखील होच येईल कोणाला काय वाटत कोण काय  म्हणेल याचा विचार राजकीय व्यक्तींनी करायचा नसतो तो करायचा सर्व सामान्य जनतेने  शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौर यांच्या राजकीय भूमिकेमुळे मतदारांमध्ये संभ्रम, नाराजी आणि आत्मपरीक्षणाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की, चूक नेमकी मतदारांची झाली की भाऊसाहेब वाकचौर यांची? शिर्डी मतदारसंघातील मतदारांनी केंद्रीय मंत्री  रामदास आठवले यांचा पराभव करून भाऊसाहेब वाकचौर यांना पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून दिले व  नंतर सदाशिव लोखंडे यांना डावलून भाऊसाहेब खासदार केले  पहिल्या कार्यकाळात निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसचा मार्ग स्वीकारला. सत्तेच्या समीकरणांचा फायदा होईल आणि विजयाचा मार्ग सुकर होईल, असा त्यांचा राजकीय अंदाज असावा. मात्र त्याचा अपेक्षित लाभ झाला नाही....

महाराष्ट्रातील २४७ पोलीस निरीक्षक झाले आता डी वाय एस पी

Image
महाराष्ट्रातील २४७ पोलीस निरीक्षकांना डीवायएसपी पदावर पदोन्नती; राहुरीचे माजी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनाही बढती घाडगे न्यूज @प्रतिनिधी  महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक दिवसांपासून रखडलेल्या पदोन्नती प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून राज्यातील तब्बल २४७ पोलीस निरीक्षकांना पोलीस उपविभागीय अधिकारी (डीवायएसपी) पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित केले असून संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीसह बदलीचे आदेशही जाहीर करण्यात आले आहेत. या पदोन्नती यादीमध्ये राहुरी येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत राहिलेले प्रमोद सदाशिव वाघ यांचा देखील समावेश आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवाकाळाची दखल घेत त्यांना डीवायएसपी पदावर पदोन्नती देण्यात आली असून मुक्ताईनगर येथे नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रमोद वाघ यांनी राहुरीसह विविध ठिकाणी पोलीस दलात जबाबदारीची पदे सांभाळताना कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हे उघडकीस आणणे तसेच जनसामान्यांशी सुसंवाद ठेवणे यामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यामुळे त्यांच्या पदोन्नतीबद्दल पोलीस अ...

इंडीयाच्या विकासा साठी भारताचा त्याग

Image
इंडियाच्या विकासासाठी भारताचा त्याग का? तरंग।शिवाजी घाडगे  देशाचा विकास हा प्रत्येक नागरिकाचा अभिमानाचा विषय असतो. आधुनिक महामार्ग, बुलेट ट्रेन, मोठी धरणे, औद्योगिक प्रकल्प, बंदरे, विमानतळ आणि स्मार्ट शहरे ही प्रगतीची प्रतीके मानली जातात. परंतु या विकासाच्या चमकदार चित्रामागे एक मूलभूत प्रश्न कायम दुर्लक्षित राहतो या विकासाची किंमत नेमकी कोण मोजत आहे? ग्रामीण आणि शहरी म्हणजे शहराचा विकासा साठी त्याग कोण करतय? चार, सहा किंवा दहा पदरी महामार्ग उभे राहताना हजारो एकर सुपीक जमीन संपादित केली जाते. बुलेट ट्रेनसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जातात. धरणांसाठी संपूर्ण गावे पाण्याखाली जातात. औष्णिक वीज प्रकल्पांसाठी जंगलांचा बळी दिला जातो आणि आदिवासींना त्यांच्या पिढ्यानपिढ्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडावे लागते. किनारपट्टीवरील प्रकल्पांसाठी मच्छीमार आणि स्थानिक नागरिकांचे जीवनमान धोक्यात येते. प्रत्येक वेळी एकच युक्तिवाद पुढे केला जातो देशाच्या विकासासाठी काही ना काही त्याग करावाच लागतो. हा युक्तिवाद चुकीचा नाही. कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीस...

नरेंद्र दराडे यांच्या हारातील फुले वाटुन गोकुळ गिते विधानपरिषदेत पोहचले

Image
नरेंद्र दराडे यांच्या हारातील फुले वाटुन गोकुळ गिते विधानपरिषदेत पोहचले   ‘राजकीय विमा’ फसला? राजरंग।शिवाजी घाडगे  नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने राज्याच्या राजकारणाला एक महत्त्वाचा धडा दिला आहे. राजकारणात पैसा, सत्ता, पद आणि प्रस्थ यांना महत्त्व असले तरी अंतिम निर्णय मतदारांच्या हातातच असतो. अनेकदा निवडणुकीपूर्वी आखलेली गणिते, बांधलेली समीकरणे आणि केलेल्या राजकीय गुंतवणुकीवर नेतेमंडळींचा प्रचंड विश्वास असतो. मात्र निकाल लागल्यानंतर वास्तव काहीसे वेगळेच चित्र दाखवून जाते. नाशिकमध्ये नेमके तेच घडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेतला नसला तरी पाठींबा देऊन प्राचार थाबवण्या साठी हार घातला यातीलच फुले वाटुन गोकुळ गिते यांनी दराडे यांची हार करत विधानपरिषदेत पोहचले असून मंगळवारी त्यानी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. कदाचित नरेंद्र दराडे यांचा भविष्यात रोष रोखण्या साठी गोकुळ गिते यांनी सेनेचे गित गायले असावे अशी चर्चा आहे.  शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा झालेला प...

दिल्लीत वाढते शिंदेंचे वजन

Image
दिल्लीत वाढते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वजन राजरंग।शिवाजी घाडगे  महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे तो म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वाढते राजकीय महत्त्व. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कोल्हापूर येथील सभेत "खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे" असे जाहीरपणे सांगितल्यानंतर या चर्चेला आणखी बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्याने लोकसभेतील शिंदे गटाच्या खासदारांची संख्या तेरा झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक पक्षांपेक्षा हे संख्याबळ अधिक असल्याने केंद्रातील सत्तासमीकरणात शिंदे यांचे महत्त्व वाढल्याचे चित्र दिसत आहे. मात्र या वाढत्या महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील वास्तव वेगळेच प्रश्न उपस्थित करत आहे. एका बाजूला दिल्लीत शिंदे यांचा गौरव होत असताना दुसऱ्या बाजूला नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव होतो. हा पराभव केवळ एका उमेदवाराचा नसून महायुतीतील अंतर्गत राजकारणाचे संकेत देणारा मानला जात आहे. भाजपने मन...

नाशकात अपक्ष गोकुळ गिते विजयी ; महायुतीच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह

Image
नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार गोकुळ गिते विजयी; महायुतीच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह राजरंग।शिवाजी घाडगे  नाशिक येथील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण केली होती. अखेर या निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी दणदणीत विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. गिते यांना सुमारे ३५७ मते मिळाली, तर शिवसेना (शिंदे गट) समर्थित महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना २४८ मतांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, या मतदारसंघात महायुतीकडे संख्याबळ अधिक असल्याचे मानले जात असतानाही त्यांच्या उमेदवाराचा झालेला पराभव राजकीयदृष्ट्या धक्कादायक मानला जात आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद, नाराजी आणि स्थानिक पातळीवरील गटबाजी पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नरेंद्र दराडे यांच्या पराभवामुळे महायुतीत सर्व काही सुरळीत नसल्याचे संकेत मिळाले आहेत. हा पराभव दराडे यांच्यासाठी वैयक्तिक पातळीवरही मोठा धक्का मानला जात आहे. महायुतीकडे पुरेसे संख्याबळ असताना पराभव कसा झाला, याचे आत्मपरीक्षण आता संबंधित पक्षांना क...

कोल्हापुरातील महालक्ष्मीची ओटी आणि पुढची चाहूल....

Image
 कोल्हापुरातील महालक्ष्मीची ओटी आणि पुढची चाहूल राजरंग।शिवाजी घाडगे  राजकारणात यश अचानक मिळत नाही. त्यासाठी वर्षानुवर्षे नियोजन, संघटन बांधणी, जनसंपर्क आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते. परीक्षेत अव्वल येणारा विद्यार्थी जसा वर्षभर अभ्यास करून आपले ध्येय निश्चित करतो, त्याचप्रमाणे राजकारणातील मोठी पदे मिळविण्याचे स्वप्न पाहणारे नेतेही अनेक वर्षे आधीपासूनच आपली रणनीती आखत असतात. त्यामुळे एखादा नेता धार्मिक स्थळांना भेट देतो, जनसंपर्क वाढवतो किंवा आपली स्वतंत्र प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा त्यामागे केवळ श्रद्धा नसून राजकीय संदेशही दडलेला असतो. नुकतीच कोल्हापुरात महालक्ष्मीची ओटी भरल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय सत्तेतील एका प्रभावशाली मंत्र्याने आगामी २०२९ च्या राजकीय समीकरणांचा विचार करून आतापासूनच तयारी सुरू केल्याची चर्चा रंगू लागली आहे. राजकारणातील प्रत्येक हालचालीचे अर्थ शोधले जात असताना या धार्मिक भेटीकडेही अनेकजण राजकीय दृष्टिकोनातून पाहत आहेत. गेल्या दशकात देशाच्या राजकारणात एका नेतृत्वाभोवती निर्माण...

शब्दांची मशाल हाती घेत शिवसेनेची मशागत करणारे दंगलकार कवी चंदनशिवे

Image
शब्दांची मशाल हाती घेत शिवसेनेची मशागत करणारे कवी नितीन चंदनशिवे राजरंग।शिवाजी घाडगे  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिन सोहळ्यात आपल्या प्रभावी आणि रोखठोक भाषणाने संपूर्ण सभागृह भारावून टाकणारे कवी नितीन चंदनशिवे हे सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांच्या भाषणानंतर सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, एका क्षणात ते राज्यभरातील शिवसैनिकांसह सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. चंदनशिवे यांच्या भाषणातील शब्दांमध्ये केवळ आक्रमकता नव्हती, तर शिवसेनेच्या विचारधारेबद्दलची निष्ठा, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचा आदर आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील भावनिक जिव्हाळाही प्रकर्षाने दिसून आला. प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू झालेला विचारांचा वारसा, पत्नीच्या निधनानंतरही तिचा फोटो जवळ बाळगणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा संवेदनशील पैलू आणि कोरोना काळात सामान्य जनतेसाठी धावून आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य त्यांनी आपल्या भाषणातून प्रभावीपणे मांडले. याचबरोबर त्यांनी युवा नेते आद...

टायगर हातात काय आहे मनात

Image
टायगर हातात काय आहे मनात  राजरंग।शिवाजी घाडगे अहिल्यानगरच्या राजकारणात सध्या एका व्हिडिओची चांगलीच चर्चा रंगली आहे. दक्षिणेचे खासदार निलेश लंके वाघासोबत फिरताना दिसले आणि राजकीय वर्तुळाला चर्चेचा नवा विषय मिळाला. राजकारणात काही गोष्टी बोलून सांगाव्या लागत नाहीत, त्या कृतीतून सांगितल्या जातात असे म्हटले जाते. त्यामुळे या व्हिडिओमागे नेमका संदेश काय, यावर तर्कवितर्कांचा बाजार भरला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या "ऑपरेशन टायगर" हा शब्द चांगलाच चर्चेत आहे. शिवसेनेच्या काही खासदारांबाबत विविध चर्चा सुरू असताना खासदार लंके यांचा वाघासोबतचा व्हिडिओ समोर येणे हा निव्वळ योगायोग आहे की सूचक राजकीय इशारा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण राजकारणात योगायोगांपेक्षा संकेतांना अधिक महत्त्व असते. आजच्या काळात विकासकामांपेक्षा फोटो, व्हिडिओ आणि प्रतिमा यांचीच अधिक चर्चा होताना दिसते. एखादा नेता मंदिरात गेला तर त्याचे राजकीय विश्लेषण होते, शेतात गेला तर त्याचा संदेश शोधला जातो आणि वाघासोबत दिसला तर त्यामागे राजकीय समीकरणे शोधली जातात. त्यामुळे या व्हिडिओची चर्चा होणे स्वाभाविकच...

खासदार राजाभाऊ राजा वाजत गाजत स्वागत

Image
खासदार राजाभाऊ खऱ्या अर्थाने ‘राजा’ ठरले! वाजत गाजत स्वागत  राजरंग।शिवाजी घाडगे  राजकारणात सत्तेची समीकरणे बदलत असतात. आज सत्ता असते, उद्या नसते. पदे, मंत्रीपदे, निधी आणि अधिकार यांचा मोह अनेकांना आपल्या विचारांपासून आणि मतदारांनी दिलेल्या विश्वासापासून दूर नेत असतो. अशा परिस्थितीत सत्तेपेक्षा निष्ठेला महत्त्व देणारे नेते समाजाच्या स्मरणात राहतात. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी अलीकडील राजकीय घडामोडींमध्ये घेतलेली भूमिका याच मूल्यांची आठवण करून देणारी ठरली आहे. ज्या विचार धारेतुन आपण निवडून आलो त्या विचार धारे बरोबर प्रामाणिक राहणाऱ्यांना शिवसैनिक काय जनता देखील आदर करते  महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत पक्षांतर, गटबाजी आणि राजकीय सोयीसाठी बदलणाऱ्या भूमिका यांची मालिका सुरू आहे. अनेकांनी सत्तेच्या दिशेने वाटचाल केली, तर काहींनी आपल्या राजकीय भूमिकेशी प्रामाणिक राहण्याचा मार्ग स्वीकारला. राजाभाऊ वाजे यांनी दुसरा मार्ग निवडला. त्यामुळेच त्यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले, फटाक्यांची आतषबाजी झाली, फुलांचा वर्षाव झाला आणि निष्ठेचा उत्स...

श्रीगोंदा पोलीस ठाण्याला एसीबीचा दणका तीन लाचखोर पोलिसांवर गुन्हा दाखल

Image
श्रीगोंदा पोलीस ठाण्याला एसीबीचा दणका; तीन  लाचखोर पोलिसांवर गुन्हा दाखल  घाठगे न्यूज।प्रतिनिधी श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली असून, लाच मागितल्याच्या आरोपावरून तीन पोलिस कर्मचाऱ्यांविरुद्ध अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे पोलीस दलातील कथित भ्रष्टाचार पुन्हा ऐरणीवर आला असून, ही केवळ तीन कर्मचाऱ्यांची बाब आहे की त्यामागे मोठी साखळी कार्यरत आहे, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. या प्रकरणातील आरोपी म्हणून नितीन अशोक गाडगे (वय ४४), राजेश रावसाहेब जाधव (वय ३८) आणि दादाराम शिवराम म्हस्के (वय ५६) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या भावाच्या अपघाताशी संबंधित प्रकरणात मदत करण्यासाठी सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप असून, नंतर ही रक्कम ७ हजार रुपयांवर निश्चित करण्यात आल्याचे एसीबीच्या पडताळणीत समोर आले आहे. पोलीस निरीक्षक राजू अल्हाट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या ...

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कपाळी कोणाचा टिळा

Image
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या कपाळी कोणाचा टिळा? राजरंग।शिवाजी घाडगे  माजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील काही खासदारांबाबत सध्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींना आपल्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून, तथाकथित "ऑपरेशन टायगर"मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचेही नाव घेतले जात आहे. या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे हे येणारा काळ स्पष्ट करेल, मात्र मतदारसंघात त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा राजकीय प्रवास चढ-उतारांनी भरलेला राहिला आहे. शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले. सेवेतून निवृत्तीनंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि शिवसेनेच्या उमेदवारीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक घडामोडी घडल्या. एका निवडणुकीत त्यांनी ...

खासदार भाऊसाहेब वाकचौरे याच्या भूमिकेबाबत चर्चा

Image
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत चर्चांना उधाण चर्चा।शिवाजी घाडगे  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या संभाव्य भूमिकेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. या चर्चांमुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, खासदार वाकचौरे हे आगामी काळात वेगळी राजकीय भूमिका घेऊ शकतात, अशी चर्चा रंगत आहे. यापूर्वीही त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि तेथून उमेदवारी मिळविली होती. त्यानंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये त्यांना पुन्हा शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी लोकसभा निवडणुकीत विजय संपादन केला. दरम्यान, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अल्पावधीत खासदारकी मिळवली होती. त्यांनी सलग दोन वेळा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मात्र, नंतरच्या राजकीय घडा...

पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना एलसीबीचा मोह सुटेना

Image
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना स्थानिक गुन्हे शाखेचा मोह सुटेना? तरंग @शिवाजी घाडगे  अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील प्रशासकीय बदल्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी पुन्हा चर्चेत आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी अलीकडेच जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या. त्यामध्ये पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची शिर्डी साईबाबा मंदिर सुरक्षा विभागात बदली करण्यात आली. मात्र, या बदली आदेशाविरोधात कबाडी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) येथे दाद मागितल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, जिल्हा पोलीस प्रशासनानेही या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मॅटसमोर कॅव्हेट दाखल केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा वाद केवळ बदलीपुरता मर्यादित न राहता प्रशासकीय चर्चेचा विषय बनला आहे. कबाडी यांनी आपला कार्यकाल पूर्ण झालेला नसल्याचे कारण देत बदलीला आक्षेप घेतला असल्याची चर्चा आहे. मात्र, पोलीस खात्यातील बदल्या या प्रशासकीय गरजेनुसार केल्या जातात आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना उ...

हरित कवच विस्तार 7लाख 65 वृक्ष लागवडीचे उदिष्ट

Image
अहिल्यानगर जिल्ह्यात हरित कवच विस्तारासाठी प्रशासन सक्रिय; ७.६५ लाख वृक्षलागवडीचे नियोजन अहिल्यानगर जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी आणि जिल्ह्याचे हरित कवच अधिक मजबूत करण्यासाठी प्रशासनाने व्यापक वृक्षलागवड मोहिमेचे नियोजन केले आहे. हवामान बदल, वाढते तापमान आणि पर्यावरणीय असंतुलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यावर्षी १४ तालुक्यांमध्ये किमान ७ लाख ६५ हजार १८ वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील १० हजार ५७५ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, वन विभागाची क्षेत्रे, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, नगरपालिका तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून ही वृक्षलागवड करण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षणासाठी सर्व घटकांचा सहभाग वाढविण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. या उपक्रमात ग्रामपंचायतींचा सर्वाधिक सहभाग राहणार असून जिल्ह्यातील १ हजार ३२७ ग्रामपंचायतींमार्फत तब्बल २ लाख ११ हजार ३०० रोपांची लागवड केली जाणार आहे. ग्रामीण भागात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी ग्रामपं...

एलसीबी समोर विश्वासार्हतेचा संतोष कमी होईल का असंतोष

Image
एलसीबीसमोरील विश्वासार्हतेचा संतोष कमी होईल का असतोष  तरंग @शिवाजी घाडगे  अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ही जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणारी आणि संघटित गुन्ह्यांविरोधात कारवाई करणारी महत्त्वाची यंत्रणा मानली जाते. त्यामुळे या विभागाची प्रतिमा, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता अबाधित राहणे अत्यंत आवश्यक असते. मात्र, गेल्या काही वर्षांत विविध वादग्रस्त घटनांमुळे एलसीबीबाबत जनमानसात प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्याकडे एलसीबीची धुरा सोपविली आहे. मुटकुळे यांनी यापूर्वी विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच युवकांमधील व्यसनाधीनता, मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम आणि सामाजिक जनजागृती यांसारख्या विषयांवर उल्लेखनीय काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीकडे आशावादी नजरेने पाहिले जात आहे. परंतु एलसीबीचे नेतृत्व स्वीकारणे आणि त्या विभागाची प्रतिमा उंचावणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नव्या अधिकाऱ्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्ह...

वृक्ष लागवड करुन पर्यावरण संरक्षण करा

Image
 वृक्ष लागवड करा पर्यावरण वाचवा        संकल्प @शिवाजी घाडगे  शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या संपून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. विद्यार्थ्यांसाठी हा नवीन उमेद, नवीन स्वप्ने आणि नवीन संकल्पांचा काळ असतो. अशा वेळी केवळ शैक्षणिक प्रगतीचा विचार न करता पर्यावरण संरक्षणाचाही संकल्प प्रत्येकाने करणे ही काळाची गरज बनली आहे. वाढते तापमान, अनियमित पाऊस, भूजल पातळीतील घट आणि प्रदूषणाच्या वाढत्या समस्यांमुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे. या संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हा सर्वात सोपा, प्रभावी आणि दीर्घकालीन उपाय आहे. आज अनेक ठिकाणी विकासाच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होत आहे. काँक्रीटच्या जंगलात हिरवाई झपाट्याने कमी होत असून त्याचे परिणाम प्रत्येकाला भोगावे लागत आहेत. उन्हाळ्यातील वाढती उष्णता, पाण्याची टंचाई आणि हवामानातील बदल ही त्याचीच उदाहरणे आहेत. त्यामुळे केवळ शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने स्वतःची जबाबदारी ओळखणे आवश्यक आहे.  उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर सोमवारपासून शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष ...

खुर्चीला महत्व आणि बदलते चेहरे

Image
 खुर्चीचा महिमा आणि बदलणारे चेहरे बदल ।शिवाजी घाडगे  शासकीय सेवेत बदली ही नित्याची बाब असते. काल एका ठिकाणी असलेला अधिकारी आज दुसऱ्या ठिकाणी असतो आणि उद्या आणखी कुठे. मात्र या बदल्यांमुळे केवळ कार्यालयांचा पत्ता बदलत नाही, तर अनेकांच्या वागणुकीचे रंगही बदलतात. अलीकडे झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर दिसणारे चित्र पाहिले की "खुर्चीला महत्त्व असते" ही म्हण किती वास्तववादी आहे याची पुन्हा एकदा खात्री पटते. कालपर्यंत नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांकडे फारसे फिरकणारे नसतात. एखाद्या कामासाठी फोन केला तर प्रतिसाद मिळेलच याची खात्री नसते. अनेकांना त्यांची आठवणही नसते. मात्र तेच अधिकारी एखाद्या महत्त्वाच्या पोलीस ठाण्याचे प्रभारी बनले की अचानक शुभेच्छुकांची रांग लागते. पुष्पगुच्छ, सत्कार, अभिनंदनाचे फलक आणि सोशल मीडियावरील पोस्टचा अक्षरशः पूर येतो. जणू काही अधिकाऱ्याची नव्हे, तर खुर्चीचीच पूजा सुरू झालेली असते. हे वास्तव केवळ पोलीस विभागापुरते मर्यादित नाही. समाजात सर्वच क्षेत्रांत व्यक्तीपेक्षा पदाला अधिक महत्त्व दिले जाते. अधिकार असेपर्यंत माणसाभोवती...

तनपुरे सहकारी साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांची आत्महत्या

Image
तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या; परिसरात हळहळ राहुरी : तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बाळासाहेब तारडे यांनी राहत्या घरात समोरील लिंबाच्या झाडाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कारखाना परिसरासह कामगार वसाहतीत शोककळा पसरली असून कामगारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. रोजगार नसल्याने आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाल्याने अनेक कामगार मानसिक तणावाखाली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अशाच परिस्थितीत बाळासाहेब तारडे यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, तनपुरे साखर कारखान्याच्या कामगार वसाहतीत घडलेली ही दुसरी आत्महत्येची घटना असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कारखाना बंदीमुळे निर्माण झालेल्या सामाजिक व आर्थिक प्रश्नांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. मृत बाळासाहेब तारडे यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, मुले तसे...

कर्तव्यासोबत पर्यावरण संरक्षण पोलीस हवालदार सागर दाणी यांचे उल्लेखनीय कार्य

Image
कर्तव्यासोबत माणुसकी, पर्यावरण व वारसा संवर्धनाची जपणूक; पोलीस हवालदार सागर दाणी यांचे उल्लेखनीय कार्य घाडगे न्यूज।@प्रतिनिधी  अहिल्यानगर  चांदबिबी पुनःप्रक्षेपण केंद्र येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार सागर दाणी यांनी आपल्या शासकीय कर्तव्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतानाच पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण, ऐतिहासिक वारसा जतन आणि सामाजिक बांधिलकी या क्षेत्रांतही उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या विविध उपक्रमांमुळे प्रशासन, पर्यावरण आणि समाजसेवा यांचा प्रभावी समन्वय साधला जात असून समाजात एक सकारात्मक आदर्श निर्माण होत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात सागर दाणी यांनी सातत्यपूर्ण आणि परिणामकारक काम केले आहे. वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनावर भर देत त्यांनी वन्यजीवांसाठी पाणवठ्यांची निर्मिती, जंगलातील वणवे विझविण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग, वन्यजीवांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी जनजागृती आणि संरक्षणात्मक उपाययोजना राबवल्या आहेत. तसेच जैवविविधतेस बाधक ठरणाऱ्या आक्रमक विदेशी वनस्पतींचे निर्मूलन करून देशी वृक्षांच्या बियांचे संकलन, रोपनिर्मिती आणि लागवडीचे उपक्रम हाती...

छत्रपतीचे विटबनेतील अज्ञात आरोपी अद्याप मोकाट

Image
छत्रपतींच्या विटंबनेचा आरोपी अद्याप मोकाट; राहुरी पोलिसांनी जाहीर केले ११ हजारांचे बक्षीस, पण आरोपी कधी सापडणार? घाडगे न्यूज @प्रतिनिधी  राहुरी शहरातील बुवासिंग बाबा तालीम परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध लावणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा राहुरी पोलिसांनी गुरुवारी केली. मात्र या घटनेला दीड वर्षांहून अधिक कालावधी उलटून गेला असतानाही आरोपीचा शोध लागलेला नाही, ही बाब केवळ खेदजनक नसून संपूर्ण यंत्रणेसाठी लाजिरवाणी मानली जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना होते आणि दीड वर्ष उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नाही, यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. गुन्हेगारांना शोधून काढण्याचा दावा करणाऱ्या यंत्रणांना एका विटंबनाखोराचा माग काढता आलेला नाही, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करू लागले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात अन्याय, अत्याचार आणि स्त्रियांचा अवमान ...

घाडगे न्यूजने दोन लाखांहून अधिक वाचकांचा टप्पा पार

Image
घाडगे न्यूजने दोन लाखांहून अधिक वाचकांचा पार केला टप्पा  घाडगे न्यूज या डिजिटल वृत्तमाध्यमाने दोन लाखांहून अधिक वाचकांपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला असून  याचा आम्हाला मनस्वी आनंद आणि समाधान आहे. वाचकांच्या विश्वास, प्रेम आणि पाठिंब्यामुळेच हा प्रवास यशस्वीपणे पुढे सुरू राहुन आमच्या वाचकांना अधिका अधिक कसदार व निष्पक्ष निर्भीड सत्य बातम्या वाचायला मिळतील  घाडगे न्यूजने सुरुवातीपासूनच सत्य, वस्तुनिष्ठ आणि रोखठोक पत्रकारितेचा मार्ग स्वीकारला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील घडामोडी निर्भीडपणे वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सातत्याने केले  आहे. सत्य मांडण्याची आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची ताकद व प्रेरणा आम्हाला आमच्या वाचकांच्या पाठिंब्यामुळेच मिळते. अनेक वाचकांच्या थेट मनापर्यत बातमी पोहचे  राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांचे जतन करण्यासाठी घाडगे न्यूज कटिबद्ध आहे. तशी आचारसंहिता आम्ही घालून घेतली असून बातमी प्रसिद्ध करताना वाचक हाच केंद्र स्थानी आहे शब्द हेच शस्त्र आणि रत्...

एलसीबीचे किरणकुमार कबाडी शिर्डी साई मंदिर सुरक्षाला

Image
अहिल्यानगर जिल्ह्यात 14 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; किरणकुमार कबाडी शिर्डी साई मंदिर सुरक्षा  अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल करत 14 पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या बदल्यांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार दशरथ कबाडी यांची शिर्डी साई मंदिर सुरक्षा विभागात नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय रामभाऊ ठेंगे यांची श्रीगोंदा पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अहिल्यानगर पोलीस नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक रविंद्र नरसिंह देशमुख यांची राहुरी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, पोलीस निरीक्षक प्रताप पांडुरंग दराडे यांची नेवासा पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस दलातील या फेरबदलांमुळे विविध पोलीस ठाण्यांच्या कामकाजात अधिक गतिमानता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज विटबखोर माहीती देणाऱ्यास 11 हजाराचा इनाम

Image
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्याचा शोध सुरू; माहिती देणाऱ्यास ११ हजारांचे बक्षीस घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राहुरी शहरातील बुवासिंग बाबा तालीम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी राहुरी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू ठेवली आहे. या प्रकरणातील आरोपीबाबत खात्रीलायक माहिती देऊन त्याला पकडण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीस ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे राहुरी शहरासह परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नागरिकांच्या मनात असलेला आदर लक्षात घेता या घटनेला अत्यंत गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते. त्यानंतर राहुरी पोलिसांनी विविध स्तरांवर तपास सुरू केला. मात्र, दीड वर्षांचा कालावधी उलटूनही विटंबना करणारा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांनी नागरिकांचे सहकार्य मिळावे यासाठी आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपीची ओळख, त्याच्या ...

रेल्वे उड्डाण पुलासाठी भूसंपादनाचे पैसे देण्या साठी लाचेची मागणी श्रीगोदा-पारनेर प्रात कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

Image
रेल्वे उड्डाणपुलासाठी भूसंपादन भरपाई प्रकरणात लाचेची मागणी; दोन कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा घाडगेन्यूज| प्रतिनिधी रेल्वे उड्डाणपुलासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या भरपाईची रक्कम खात्यात वर्ग करण्यासाठी तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी श्रीगोदा-पारनेर उपविभागीय कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगेश विजय ढुमणे (महसूल सहाय्यक) आणि अमोल काशिनाथ खामकर (कंत्राटी कामगार) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे महसूल विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा तालुक्यातील जंगलेवाडी येथील एका शेतकऱ्याची गट क्रमांक 13 मधील 143 गुंठे जमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548-डी अंतर्गत रेल्वे उड्डाणपूल उभारणीसाठी शासनाने भूसंपादन केली होती. या भूसंपादनाच्या बदल्यात संबंधित शेतकऱ्यास 1 कोटी 47 लाख रुपयांची भरपाई मंजूर झाली होती. भरपाईची रक्कम आपल्या खात्यावर वर्ग व्हावी यासाठी संबंधित शेतकरी प्रांत कार्यालयात पाठप...

निवासी अतिक्रमणे नियमित करण्या साठी ढुस यांच्या कडून जनजागृती मोहीम

Image
निवासी अतिक्रमणे नियमित होण्यासाठी आप्पासाहेब ढूस यांच्याकडून रहिवाशांमध्ये जनजागृती मोहीम राहुरी : शासन निर्णयातील तरतुदीनुसार देवळाली प्रवरा हद्दीतील निवासी अतिक्रमणे नियमित होण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब ढूस यांनी रहिवाशांमध्ये जनजागृती मोहीम सुरू केली आहे. देवळाली प्रवरा येथील समर्थ बाबुराव पाटील वसाहत परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आप्पासाहेब ढूस यांनी शासन निर्णयातील विविध तरतुदींची माहिती नागरिकांना दिली. यावेळी गजानन येवले, अबूबकर शेख, बाळू पेटारे, राहुल गायकवाड, कांतीलाल गायकवाड, संगीता सोज्वल, रैसा शेख, सुग्राबी शेख, मार्था बोर्डे, दत्तात्रय देसाई, शारदा थोरात, बबन सरोदे, अनिल खरात, बाळू पंडित, सोमनाथ कांबळे, दीपक थोरात, नर्मदा वरगुडे, कुसुम बोरकर, सतीश गायकवाड, रमाबाई पालवे, आत्माराम शिंदे, रतनबाई बाबुळके, चंद्रकांत दहिवाले, सुनीता म्हस्के, आकाश पेटारे, लीलाबाई पेटारे, संगीता देसाई, सिद्धार्थ दहिवाले आदींसह परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपले मत मांडताना आप्पासाहेब ढूस यांनी १ जानेवारी २०११ पूर्वी शासनाच्या ...

आता आम्ही आहोत तुमच्या समवेत

Image
आम्ही आहोत तुमच्या पाठीशी!  राजकीय शुभेच्छांचा अर्थ काय राजरंग।शिवाजी घाडगे  अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून बिनविरोध निवडून आलेले आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील  तसेच  सुजय विखे-पाटील  उपस्थित होते. या सत्कारानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री सत्कार करताना नेमके काय म्हणाले असतील, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. "घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी," असे काहीसे आश्वासक शब्द त्यांनी उच्चारले असतील का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काही जण तर मिश्किलपणे असेही म्हणू लागले आहेत की, "तुम्हाला पक्षात घेतले आणि अवघ्या काही दिवसांत आमदारकीची संधी मिळाली; आता तरी मामांना सांगा या ईकडे अर्थात हा राजकीय उपहासाचा भाग असला तरी सध्याच्या राजकारणातील वेगवान घडामोडी पाहता अशा चर्चांना खतपाणी मिळणे स्वाभाविक आहे. विशेष म्हणजे, बिनविरोध निवड होणे ही कोणत्याही राजकारण्या...