जिद्दीला आत्मविश्वासाची जोड द्या:कुलगुरु डॉ पी जी पाटील
जिद्द, संवेदना व धाडस असेल तर तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील राहुरी कृषि क्षेत्रामध्ये खूप सार्या अमर्याद संधी उपलब्ध आहेत. तुम्ही नोकरीच्या मागे न लागता त्या अमर्याद संधींचा फायदा घ्या. स्वतःमध्ये नेहमी कृतीशीलता बाळगा त्याचबरोबर काहीतरी नवीन साध्य करण्यासाठी प्रयोगशीलताही जपा. तंत्रज्ञान दिवसेंदिवस बदलत आहे, ते तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तयारी ठेवा. तुमच्यामध्ये जिद्द, संवेदना व धाडस असेल तरच तुम्ही जीवनात यशस्वी व्हाल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठात डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटना व नाहेप प्रकल्पाच्या सहयोगाने महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनाचे आयोजन नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य व प्रसिद्ध व्याख्या...