गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहात रंग न बदलनारा भला मोठा सरडा
गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहा सरडा रंग न बदलणारा..... भाष्य।शिवाजी घाडगे प्रत्येक वर्षी गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताह आयोन जिल्ह्यात होत असते या वर्षी धनगरवाडी येथे हा सप्ताह सुरु असुन या ठिकाणी कृषीप्रर्दशन भरले असून यात तब्बल २१किलो वजनाचा सरडा पाहायला मिळतोय मोठ्या भक्तिभावाने गंगागिरी महाराज १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहाला केवळ अहिल्यानगर जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविक उपस्थित राहतात. भक्ती, श्रद्धा, सेवा, सामाजिक एकोपा आणि संतपरंपरेचे दर्शन घडविणारा हा सप्ताह आता एक मोठी धार्मिक आणि सामाजिक परंपरा बनला आहे. बहुजन समाजातील सर्वसामान्य माणसाला अध्यात्माची गोडी लागावी, त्याला भक्तीच्या माध्यमातून एकत्र आणता यावे आणि त्याचबरोबर त्याला गोडधोड महा प्रसाद मिळावा, या हेतूने महंत गंगागिरी महाराज यांनी या हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली. पुढे नारागिरी महाराज यांनी ही परंपरा अखंड सुरू ठेवली आणि आता रामगिरी महाराज ती पुढे नेत आहेत. त्यामुळे अनेक वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने आणि उत्साहाने...