सत्तेच्या सावलीतून व्यवसायांच्या प्रकाशझोतात त्यांची चाॅइस द नाईस
सत्तेच्या सावलीतून व्यवसायाच्या प्रकाशझोतात त्यांची चाॅइस द नाईन्स भाष्य।शिवाजी घाडगे सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तीने व्यवसाय करणे हा काही गुन्हा नाही. उलट, राजकारणाबरोबर उद्योग-व्यवसाय उभारणे आणि स्वतःच्या पायावर उभे राहणे ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, जेव्हा एखादी व्यक्ती घटनात्मक स्वरूपाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळून सार्वजनिक जीवनात मोठी ओळख निर्माण करते आणि त्यानंतर अचानक कोट्यवधींच्या गुंतवणुकीच्या व्यवसायामुळे चर्चेत येते, तेव्हा जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. या प्रश्नांना ‘राजकीय सूड’ म्हणून झटकून न टाकता त्यांची उत्तरे पारदर्शकपणे देणे हीच लोकशाहीची खरी कसोटी आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. यावेळी त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे नव्हे, तर पुण्यातील कल्याणीनगर परिसरात सुरू करण्यात आलेल्या नव्या हॉटेल व्यवसायामुळे राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर विविध चर्चा रंगल्या आहेत. रुपाली चाकणकर यांनी पुण्यात ‘द नाईन्स...