पॅलस्टीक पुर्नवापर करा-कुलगुरु डॉ पी जी पाटील
प्लॅस्टिकचा पुर्नवापर करण्याबरोबरच प्लॅस्टिकला शाश्वत पर्याय शोधावा लागेल - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील दिवसेंदिवस प्लॅस्टिकची समस्या उग्र रुप धारण करीत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणाबरोबरच मानवी जीवनावरही होताना दिसत आहे. झालेल्या एका संशोधनानुसार मानवाच्या संपुर्ण आयुष्यात 20 किलोपर्यंत प्लॅस्टिक त्याच्या पोटात जात आहे. या मायक्रोप्लॅस्टिकमुळे कॅन्सर तसेच विविध रोगांमुळे मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. अशा या प्लॅस्टिकला बंदी हा पर्याय नाही तर प्लॅस्टिकचा पुर्नवापर करण्याबरोबरच प्लॅस्टिकला शाश्वत पर्याय शोधावा लागेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात इन्स्टीट्युशन ऑफ इंजिनिअर्स, अहमदनगर लोकल सेंटर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ व अहमदनगर येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या विद्यमाने वसुंधरा दिवस-2024 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची थीम पृथ्वी विरुध्द प्लॅस्टिक ही ...