Posts

Showing posts with the label तुर

तुर तंत्रज्ञान मुळे स्वयमपुर्ण विकासाकडे-डाॅ नंदकुमार कुटे

Image
तुरीचे सुधारीत वाण व तंत्रज्ञानामुळे डाळीच्या स्वयंपुर्णतेकडे वाटचाल - प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या तुरीच्या सुधारीत वाणांमुळे व तंत्रज्ञानामुळे तुरीचे उत्पन्न वाढून आपण डाळीमध्ये स्वयंपुर्ण होवू शकतो असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी केले. कडगांव, ता. पाथर्डी येथील तूर उत्पादक शेतकर्यांच्या शेतावर कडधान्य सुधार प्रकल्पाच्या वतीने शिवारफेरी व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शेतकर्यांना डॉ. कुटे यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी तूर किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ व रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण उपस्थित होते. कृषि विद्यापीठांनी विकसीत केलेल्या तुरीच्या नवीन सुधारीत वाणांची व तंत्रज्ञानांची शेतकर्यांना माहिती व्हावी आणि या सुधारीत वाणांचा व तंत्रज्ञानाचा शेतकर्यांनी आपल्या शेतामध्ये प्रत्यक्ष अवलंब करुन भरघोस उत्पन्न घ्यावे म्हणून विद्यापीठाच्या वतीने यावर्षी राहुरी, पाथर्डी, नगर, संगमनेर, श्रीरामपूर, कर्जत, श्रीगोंदा व राहाता या तालुक्य...