कायदा व सुव्यवस्था पाळा - ना विखे-पाटील
नगर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठीप्रशासनास सहकार्य करावे समाजामध्ये अशांतता व तेढ निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा -पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती बैठ जिल्ह्याला धार्मिकतेची फार मोठी परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत जिल्ह्यात होणारे सण, उत्सव शांततेत साजरे व्हावेत, जिल्ह्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हावासीयांनी प्रशासनास सर्वोतोपरी सहकार्य करावे. तसेच समाजामध्ये अशांतता व तेढ निर्माण करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा व पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री विखे पाटील बोलत होते.खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार लहू कानडे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला,अपर जिल्हाधिकारी सुहास माप...