Posts

Showing posts with the label सेमिनार

पृथ्वी सर्वधनाची गरज-कुलगुरु पाटील

Image
पृथ्वी सर्वधनाची गरज पृथ्वीचे संवर्धन करण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील पर्यावरणाच्या संरक्षणाबरोबरच त्याचे संवर्धन करण्याची सर्व मानवजातीमध्ये जागृकता निर्माण होण्यासाठी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. रासायनिक खतांचा व किटकनाशकांचा भरमसाठ वापर तसेच प्लॅस्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे पाण्याचे व मातीचे प्रदुषण तसेच औद्योगीकरणामुळे हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदुषण होत असून जागतीक तापमानात वाढ झाल्यामुळे शेती क्षेत्रावर अनिष्ट परिणाम होत आहेत. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधूनच पृथ्वीच्या संवर्धनाबरोबरच संरक्षण होणे शक्य असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात अहमदनगर लोकल सेंटरच्या अभियांत्रिकी संस्था, महात्मा फुले कृषि विद्यापीठ व अहमदनगर येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या विद्यमाने वसुंधरा दिवस-2023 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध...