Posts

Showing posts with the label एम पी के व्ही

एकात्मिक शेती प्रकल्प मंजूर

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील एकात्मिक शेती पध्दती प्रकल्पाला पीक  विविधीकरणाचा पथदर्शक प्रकल्प मंजुर महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे एकात्मिक शेती पध्दती प्रकल्प कार्यरत आहे. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या उत्तरप्रदेशातील मोदीपूरम येथील भारतीय शेती प्रणाली संस्थेने पीक विविधीकरणाचा पथदर्शक प्रकल्प राबविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठातील एकात्मिक शेती पध्दती प्रकल्पाची निवड केली आहे. भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे देशातील विविध राज्यातील 75 जिल्ह्यात सन 2023-24 ते 2027-28 या पाच वर्षांकरीता पीक विविधीकरणाचा पथदर्शक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यकक्षेत येणार्या प्रत्येक जिल्ह्यात शेतकर्यांच्या 100 हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प पुढील पाच वर्षांसाठी राबविला जाणार आहे.  यामध्ये बदलत्या हवामानानुसार व जमिनीचे आरोग्य अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विविध पीक पध्दतींचा अवलंब करणे आणि त्या अनुशंगाने सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जेदार व अधिकाधिक उत्पन्न घेण्याबरोबरच जमिनीची सुपीकता ठ...

उद्योजक अनुभव कार्यशाळा

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठात आयोजीत उद्योन्मुख उद्योजक - प्रवास आणि अनुभव कार्यशाळेचे तांत्रिक सत्र संपन्न महात्मा फुले कृषि विद्यापीठातील जागतिक बँक अर्थसहाय्यित राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान प्रकल्पाद्वारे उद्योन्मुख उद्योजकांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून सचिव तथा महासंचालक डॉ. हिमांशू पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. यावेळी नाशिक येथील सुप्रसिद्ध उद्योजक सह्याद्री फार्मचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक इंजि. श्री. विलास शिंदे ऑनलाईन उपस्थित होते. याप्रसंगी संशोधन संचालक आणि कास्ट प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, संचालक विस्तार शिक्षण डॉ. सी.एस. पाटील, भा.कृ.अ.प.च्या राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. के.के. पाल उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये तीन तांत्रिक सत्र घेण्यात आले. पहिल्या ...