Posts

Showing posts with the label दुष्काळग्रस्त भागातील दिवाळी

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला शेतकऱ्यांच्या घरी पिठल भाकरीचा अस्वाद

Image
शेतकऱ्यांच्या बांधावरची दिवाळी की राजकीय संवेदनशीलतेचा संदेश भाष्य ॥शिवाजी घाडगे  दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि मांगल्याचा सण. मात्र, ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंबांसाठी यंदाची दिवाळी दुष्काळाचे सावट, पाण्याची टंचाई, पिकांचे नुकसान आणि आर्थिक विवंचना घेऊन आली आहे. घरात दिवाळीचा दिवा पेटविताना शेतकऱ्यांच्या मनात मात्र पुढील हंगामाची चिंता आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कळसपिंपरी येथील शेतकरी भिवसेन शंकर भवार यांच्या घरी जाऊन साजरी केलेली दिवाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे वडील दिवंगत खासदार बाळासाहेब विखे-पाटील यांची अनेकांना  आठवण झाली  दिवंगत खासदार विखे-पाटील अनेकदा दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करत तेथील परिस्थिती समजून घेत पिठल भाकरीचे जेवण घेत असत    केवळ एक औपचारिक भेट म्हणून पाहता येणार नाही. त्यामागे शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा आणि त्यांना आधार देण्याचा संदेश दडलेला आहे. सत्तेच्या राजकारणात अनेकदा सामान्य माणसाचे प्रश्न भाषणांपुरते मर्यादित राहतात. व्यासपीठावरून शेतकऱ्यांच्या प्...