ड्रग्ज मध्ये पोलिस सहभागाचा गजर
ड्रग्ज मध्ये नगरच्या पोलिस सहभागाचा गजर ! घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे नगर जिल्हा पोलीस दलात ड्रग्जप्रकरणाचा गंभीर गजर वाजला आहे. पुणे स्थानिक गुन्हे शाखेने नगरच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात मंगळवारी पहाटे ताब्यात घेऊन कारवाई केल्याने खळबळ उडाली असून, ड्रग्जविषयक चर्चेला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर एमआयडीसीत मोठी कारवाई झाली होती. त्यात देखील कोणी कोणी माती खाल्ली? आता मात्र परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की “करह झाला, कुपणच शेत खायला लागले” असे म्हणण्याची वेळ आली आहे. सामान्य नागरिकासाठी पोलीस म्हणजे आधार. अडचणीत असताना धावून येणारी यंत्रणा. खाकी पाहताच भल्या भल्या गुन्हेगारांची घामछूट होते. मात्र आज त्याच पोलीस यंत्रणेतील काही घटक थेट गुन्हेगारांना साथ देत अवैध धंद्यांचे भागीदार होत असतील, तर हा प्रश्न केवळ कायदा-सुव्यवस्थेचा न राहता संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचा ठरतो. पोलीस कर्मचाऱ्यांचा पगार मर्यादित असला, तरी त्यांचा रुबाब आणि अधिकार मोठा असतो. मग इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जसारख्या गंभीर गुन्ह्...