Posts

Showing posts with the label ध्वजारोहण

नगर जिल्ह्य़ाचा सर्वागीण विकास-ना विखे

Image
जिल्ह्याचा विकास ना विखे-पाटील जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करुन जिल्हा सर्व क्षेत्रात अग्रेसर राहण्याचे दृष्टीने प्रयत्न करणार - पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील   जिल्हयाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प करुन जिल्हा सर्व क्षेत्रात अग्रेसर राहण्याचे दृष्टीने प्रयत्न करणार असून शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतीने करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल,पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.  महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस मुख्यालय परेड ग्राऊंड येथे आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्याहस्ते ध्वजारोहण झाले. त्यावेळी  श्विखे पाटील बोलत होते.  या समारंभात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे,  जिल्हयातील स्वांतत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे विभा...