Posts

Showing posts with the label कृषी

गुणवंता व मानाकण विद्यापीठाला महत्वाचे-कुलगुरु डॉ. विलास खर्चे

Image
गुणवत्ता आणि मानकीकरण हेच कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचे आधारस्तंभ- कुलगुरू डॉ. विलास खर्चे राहुरी।प्रतिनिधी   विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील मानकांचे शिक्षण मिळावे औद्योगिक मानके आणि गुणवत्ता नियंत्रणाविषयी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती मिळावी, यासाठी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 'भारतीय मानक ब्यूरो' (BIS) विद्यार्थी शाखेचे योगदान नक्कीच मोठे आहे. हे पाऊल कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी तयार करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. गुणवत्ता आणि मानकीकरण हे कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीचे महत्त्वाचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. कृषी विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी  व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात भारतीय मानक ब्यूरो (BIS) च्या विद्यार्थी शाखेच्या ( स्टुडन्ट चाप्टर) उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते.          याप्रस...

फुले सुपर बायोमिक्स वरदान-कुलगुरु शरद गडाख

Image
फुले सुपर बायोमिक्स शेतकर्यांसाठी वरदान - कुलगुरू डॉ. शरद गडाख महात्मा फुले कृषि विद्यापीठ उत्पादीत फुले सुपर बायोमिक्स जैविक उत्पादन शेतकर्यांसाठी वरदान ठरणार आहे. या उत्पादनामुळे शेतकर्यांना कमी खर्चामध्ये अनेक प्रकारच्या किडी व रोगांपासून त्यांच्या पिकांचे संरक्षण करता येणार आहे. याचा जास्तीत जास्त शेतकरयांनी फायदा घ्यावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभागामध्ये फुले सुपर बायोमिक्स या जैविक उत्पादनाच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषीभूषण सुरसिंग पवार, वनस्पती रोग शास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अण्णासाहेब नवले, प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नितीन दानवले व वनस्पती रोग शास्त्र व अनुजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय कोळसे ...