Posts

Showing posts with the label नियोजन कृषीचे

कांदा व लसूण पिकांवर कृत्रिम तंत्रज्ञान संशोधन हवे-कुलगुरु विलास खर्चे

Image
कांदा व लसुन या पिकांच्या संशोधनामध्ये आता कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर आवश्यक - कुलगुरू डॉ. विलास खर्चे राहुरी । महाराष्ट्रामध्ये कांदा पिकातील 40% क्षेत्र हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या कांद्याच्या फुले समर्थ या वाणाखाली असून रब्बी हंगामासाठी फुले स्वामी हा वाण प्रसारित करण्यात आला आहे. कांदा व लसूण या पिकांमधील निर्यातक्षम वाणासाठी रंग, साईज व टिकवणक्षमता यावर अधिक काम करण्याची गरज आहे. आपल्याला काटेकोरपणे खते व औषधांचा वापर करण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात कांदा आणि लसूण पिकांवरील 17 व्या वार्षिक बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी  अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते. याप्रसंगी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के. ई. लवांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पुणे येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद अंतर्गत असलेले राष्ट्...