शेती व शेतकरी समृध्दी साठी प्रयत्न
शेती व शेतकरी समृद्ध साठी प्रयत्न राज्य शासनाने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांमुळे आणि जिल्हा प्रशासनाने प्रभाविपणे राबविलेल्या विविध योजनांमुळे जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन वर्षात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासोबत कृषी विकासाला गती मिळण्यास मदत झाली आहे. कांदा अनुदान योजना २०२२-२३ अंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्यात आले. जिल्ह्यात ५५ हजार ३६८ लाभार्थी असून प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे रुपये ११५ कोटी ९६ लाख ६४ हजार रुपयांचे अनुदान लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या १ लाख ५०० शेतकऱ्यांना बँकांकडून घेतलल्या अल्प मुदत पीक कर्जाची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये ५० हजार या कमाल मर्यादेत रुपये ३६२ कोटी २३ लाख एवढा प्रोत्साहनपर लाभ देण्यात आला. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये खरीप व रब्बी हंगामात गेल्या तीन वर्षात ५ लक्ष १३ हजार ३७ शेतकऱ्यांना ११ अब्ज ६५ कोटी ४७ लाख ९२ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित ...