दादा जरा दमान पाय काढू नका पायावर उभे करा
दादा, जरा दम्यानं… पाय काढू नका, लोकांना पायावर उभं करा भाष्य घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे देवळाली प्रवरा नगरपालिकेत पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून सत्यजित कदम यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे. मात्र विजयानंतर झालेल्या आभार सभेत “पाय काढण्याची” भाषा वापरणे योग्य नाही, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आपल्या पदाचा आणि पक्षाचा उपयोग लोकांना पायावर उभे करण्यासाठी व्हायला हवा. कारण तुमचे पाय खेचण्याचे प्रयत्न करणारे लोक तुमच्या पक्षातही आहेत, हे वास्तव आहे. सलग दुसऱ्यांदा नगराध्यक्ष होणारे तुम्ही देवळाली प्रवराचे पहिलेच नगराध्यक्ष आहात. तुमचे वडील माजी आमदार चंद्रशेखर कदम हेही अवघ्या एका मताने नगराध्यक्ष झाले होते आणि पुढे राहुरीचे आमदार बनले. कदाचित तुम्हीही भविष्यात आमदार व्हाल, मात्र सध्या तरी दादा, जरा दम्यानं वागण्याची गरज आहे. तसे पाहिले तर नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासाठी ही निवडणूक वैयक्तिकदृष्ट्या फारशी अवघड नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अप्रत्यक्ष मदत मिळाल्याचे बोलले जाते. शिवाय केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने “देवळालीत पुन्हा भाजपलाच सत्...