विमान आपघात धुकं की धोका
धुकं की धोकं? सत्याच्या शोधात राजकारणाची सावली चर्चा घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी भेट घेत या अपघाताच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले. “अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे?” हा राज ठाकरे यांचा सवाल केवळ शब्दांचा खेळ नाही; तो शासनाच्या पारदर्शकतेवर थेट बोट ठेवणारा आहे. अपघात ही केवळ एक दुर्दैवी घटना नसते. ती प्रशासन, सुरक्षा व्यवस्था, तांत्रिक दक्षता आणि जबाबदारी यांच्या साखळीची कसोटी असते. अशा वेळी जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. ते प्रश्न दाबून टाकणे हा उपाय नसतो; उलट त्यांना स्पष्ट उत्तर देणे हीच लोकशाहीची खरी ताकद असते. रोहित पवार यांनी एफ आय आर नोंदवण्याची आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. मागणी चुकीची नाही. परंतु प्रश्न असा आहे की या मागणीमागे केवळ सत्याचा शोध आहे की राजकीय गणितांचे सावट? कारण गेल्या काही दिवसांत या...