Posts

Showing posts from February, 2026

पत्रकार संजय आवटे यांचे श्रीरामपूरात व्याख्यान

Image
पत्रकार संजय आवटे यांचे श्रीरामपूरात  व्याख्यान  दिवगंत माजी केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे स्मृती व्याख्यान माले साठी आज रविवारी सायकळी 5 वाजता जेष्ठ पत्रकार संजय आवटे यांचे व्याख्यान होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बाळासाहेब थोरात असणार आहेत 

दादांचा आपघात अहवाल अण अनुत्तीर्ण प्रश्न

Image
अपघात, अहवाल आणि अनुत्तरित प्रश्न तरंग घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  दादा आपल्यातून जाऊन आज एक महिना पूर्ण झाला. गेल्या महिनाभरात त्यांच्या विमान अपघाताबाबत असंख्य तर्क-वितर्क रंगले. एखाद्या नेत्याचे नाव सलग महिनाभर जनतेच्या ओठांवर राहणे ही साधी गोष्ट नसते; दादांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा प्रभाव आणि त्यांच्या कार्याची छाप याचे ते द्योतक आहे. अपघातानंतर कुटुंबावर अचानक कोसळलेला हा आघात मोठाच होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय यांच्यासह संपूर्ण कुटुंब या दु:खातून सावरत असताना सार्वजनिक जीवनात अनेक चर्चा रंगत राहिल्या. बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पार्थ पवार यांना आलेले अपयश हे दादांच्या हयातीतच त्यांच्या मनाला लागले होते, अशी चर्चा होती. कुटुंबातील आणि राजकीय पातळीवरील मतभेदही उघडपणे दिसत होते. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी आपल्या काकांबाबत न्यायाची मागणी करत अपघाताच्या चौकशीबाबत प्रश्न उपस्थित केले. रक्ताच्या नात्यांमध्ये निर्माण झालेली दरी कमी करण्याचा त्यांचा प्रयत्नही दिसून आला. दादा हयात असताना ज्या ...

डिजिटल युगात वाचन चळवळ आबादीत-शालिनी विखे-पाटील

Image
डिजिटल युगातही वाचन संस्कृती अबाधित, ग्रंथोत्सव ज्ञानपरंपरेचा सन्मान- शालिनी विखे पाटील  घाडगे न्यूज।प्रतिनिधी  ​ ग्रंथांना आपण ‘गुरू’ची उपमा देतो. जसा गुरू शिष्याला ज्ञानाने समृद्ध करतो, तसेच ग्रंथ वाचकाला वैचारिक व बौद्धिकदृष्ट्या समृद्ध करतात. डिजिटल क्रांतीच्या युगात काळ बदलत असला तरी वाचन संस्कृती कधीच थांबणार नाही, ती नव्या माध्यमांतून अधिक व्यापक होईल, असा अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ना. विश्वास शालिनी विखे पाटील यांनी व्यक्त केला. वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत असून समाजातील सर्व घटकांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ​प्रवरानगर येथील खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृहात जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५’ च्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती विखे पाटील बोलत होत्या. ​यावेळी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. मगरे, सरपंच कल्पना मैड, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहायक ग्रंथ संचालक सचिन जोपुळे, साहित्यिक जयंत येलूल...

विमान आपघात धुकं की धोका

Image
धुकं की धोकं? सत्याच्या शोधात राजकारणाची सावली चर्चा घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी भेट घेत या अपघाताच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केले. “अपघात धुक्यामुळे झाला की धोक्यामुळे?” हा राज ठाकरे यांचा सवाल केवळ शब्दांचा खेळ नाही; तो शासनाच्या पारदर्शकतेवर थेट बोट ठेवणारा आहे. अपघात ही केवळ एक दुर्दैवी घटना नसते. ती प्रशासन, सुरक्षा व्यवस्था, तांत्रिक दक्षता आणि जबाबदारी यांच्या साखळीची कसोटी असते. अशा वेळी जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. ते प्रश्न दाबून टाकणे हा उपाय नसतो; उलट त्यांना स्पष्ट उत्तर देणे हीच लोकशाहीची खरी ताकद असते. रोहित पवार यांनी एफ आय आर नोंदवण्याची आणि स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. मागणी चुकीची नाही. परंतु प्रश्न असा आहे की या मागणीमागे केवळ सत्याचा शोध आहे की राजकीय गणितांचे सावट? कारण गेल्या काही दिवसांत या...

देवळाली नगर पालिकेत नगरसेवकांची बसायची पंचायत

Image
बसायची पंचायत… मग विकासाची दिशा कशी ठरवणार? तरंग घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या सभागृहात उभा राहिलेला “बसायचा” वाद हा केवळ खुर्च्यांचा प्रश्न नाही; तो स्थानिक लोकशाहीच्या संस्कारांचा कस लावणारा प्रसंग आहे. जर विरोधी नगरसेवक यांची बसायची पंचायत असेल तर विकासाची दिशा कशा ठरवणर.    लोकप्रतिनिधी सभागृहात बसतात ते मानाच्या जागेसाठी नव्हे, तर जनतेच्या विश्वासासाठी. आणि जर त्या सभागृहातच सन्मानाची उणीव भासू लागली, तर विकासाच्या चर्चा किती परिणामकारक होतील? बैठकीत पाणीपट्टी दरवाढीचा मुद्दा  देखील शहरात देखील तापलेला आहेच.     एका बाजूला वीजबिलाचा वाढता बोजा, सिंचन विभागाकडून आकारली जाणारी पाणीपट्टी आणि नगरपालिकेचे तुटपुंजे उत्पन्न हे प्रशासनाचे गणित. दुसऱ्या बाजूला महागाईने हैराण झालेला नागरिकहा विरोधकांचा मुद्दा. दोन्ही बाजूंचा हेतू शहरहिताचाच असायला हवा; पण हेतू शुद्ध असेल, तर पद्धतही पारदर्शक आणि सन्मानाची असावी लागते. विरोधी नगरसेवकांना बसण्याची योग्य व्यवस्था न देणे, सार्वजनिक कार्यक्रमांत व्यासपीठावर स्थान न देणे हे के...

महिला महापौरांच्या हातातील घड्याळ केव्हड्याचे

Image
घड्याळाची किंमत की विश्वासाची? तरंग चर्चेचे।शिवाजी घाडगे  एखाद्या महापालिकेच्या महिला महापौरांच्या हातातील केव्हड्याचे एवढे महागडे घड्याळ  सुमारे .... रुपयांचे घड्याळ असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि क्षणार्धात चर्चा पेटली—“हातावरच इतके महागडे घड्याळ असेल तर बाकी काय?” प्रश्न घड्याळाच्या ब्रँडचा नाही; प्रश्न आहे प्रतिमेचा, नैतिकतेचा आणि सार्वजनिक विश्वासाचा. राजकारणात प्रतीकांचे महत्त्व मोठे असते. साधेपणा, पारदर्शकता आणि जनतेशी नाळ जोडलेली असल्याची भावना—ही लोकप्रतिनिधींची खरी भांडवलं. अशा वेळी लाखोंच्या-कोट्यवधींच्या वस्तूंचे प्रदर्शन जनमानसात शंका निर्माण करते. विशेषतः जेव्हा महागाई, बेरोजगारी, पायाभूत सुविधा, पाणी-रस्ते यांसारखे प्रश्न प्राधान्याने सोडवायचे असतात, तेव्हा वैभवाचे दर्शन लोकांच्या मनात दुरावा निर्माण करू शकते. नक्कीच, प्रत्येक व्यक्तीला वैयक्तिक संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे. समर्थक म्हणतात, “राजकीय प्रवासाचे साक्षीदार आहोत; कामे मार्गी लागली की चाहत्यांकडून भेटवस्तू येतात.” हेही वास्तव असू शकते. पण सार्वजनिक पदावर असताना ‘हितसंबंधां...

देवळाली प्रवरा पाणी दर वाढ रद्द करा-नगसेविका पल्लवी ढुस

Image
पाणीपट्टी दर वाढ निर्णय रद्द करा  - नगरसेविका पल्लवी वैभव ढूस  देवळाली प्रवरा ।प्रतिनिधी  देवळाली प्रवरा शहरातील  नागरिकांना विश्वासात न घेता १८०० रुपयांवरून थेट ३००० रुपये पाणीपट्टी वाढविण्याचा देवळाली प्रवरा नगरपरिषदेने घेतलेला निर्णयाने नागरिकांच्या डोळ्यात पाणी आले असून ही जाचक पाणी पट्टी दर वाढ नागरिकांना विश्वासात न घेऊन केली असून ती    करा अन्यथा ०६ मार्च २०२६ रोजी नगरपरिषद कार्यालयात आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या नगरसेविका पल्लवी वैभव ढूस यांनी देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे  आमदार हेमंतजी ओगले यांना २५ मार्च रोजी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.    पल्लवी ढूस यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना आकारण्यात येणारी पाणीपट्टी ही त्यांच्या आर्थिक क्षमतेशी सुसंगत्व व्यवहार्य असणे आवश्यक आहे.  तथापि, देवळाली प्रवरा नगरप...

कॅमेऱ्यासमोर रडताना...हसताना..

Image
कॅमेऱ्यासमोर रडताना... हसताना..  संवेदना ॥शिवाजी घाडगे ॥ राजकारण म्हणजे केवळ सत्ता, पद आणि समीकरणांचा खेळ नाही; ते समाजजीवनाचे प्रतिबिंब असते. पण अलीकडील घडामोडी पाहताना एक अस्वस्थ करणारा प्रश्न पुन्हा पुन्हा डोके वर काढतो — राजकारणात प्रवेश करताच माणूस बदलतो का, की सत्तेच्या स्पर्धेत त्याच्या संवेदनाच हरवतात? सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्यांकडून समाज अपेक्षा ठेवतो ती केवळ निर्णयक्षमतेची नाही, तर संवेदनशीलतेचीही. कारण ते फक्त पक्षाचे प्रतिनिधी नसतात, तर समाजाच्या भावविश्वाचेही प्रतिनिधित्व करीत असतात. मात्र अनेकदा दुःखाचे प्रसंगही राजकीय रंगमंचावर ‘इव्हेंट’ ठरतात. कॅमेऱ्यासमोर उमटणारे अश्रू आणि कॅमेऱ्यामागे सुरू होणारी राजकीय रणनीती — या दोन टोकांमधील दरीच आज सर्वाधिक अस्वस्थ करते. “राजकारणात कोण कुणाचं नसतं,” ही म्हण आपण वारंवार ऐकतो. परंतु ही वस्तुस्थिती म्हणून स्वीकारताना आपण माणुसकीलाही गहाण ठेवायचं का? मतभेद असू शकतात, राजकीय भूमिका भिन्न असू शकतात; पण दुःख, आपुलकी आणि संवेदना या मूल्यांना तरी पक्षरेषा नसाव्यात. अन्यथा राजकारण हे समाजघटकांना जोडण्याऐवजी अधिक दुर...

देवळाली प्रवरा नगरपालिका पाणी दर वाढ कमी करा-नगरसेविका थोरात

Image
देवळाली प्रवरा नगरपरिषद कार्यावर पाणी पट्टी दर वाढ रद्द करा  -नगरसेविका सुनिता थोरात  प्रतिनिधी।देवळाली प्रवरा देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या विद्यमान नगरसेविका सुनिता सुरेंद्र थोरात आदोलनाचा इशारा दिला आहे वाढीव पाणी पट्टी रद्द करावी  देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पाणीपट्टी १,८००/- रुपयांवरून थेट ३,०००/- रुपये इतकी वाढ करण्याचा बेकायदेशीर, अन्यायकारक व जनता  विरोधी निर्णय तात्काळ रद्द करण्या यावा  देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेतलेला पाणीपट्टी दर १,८००/- रुपयांवरून ३,०००/- रुपये करण्याचा निर्णय हा सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक कोंडी लक्षात न घेता, लोकशाही मूल्यांना तिलांजली देत व जनतेवर जबर आर्थिक बोजा टाकणारा असून, तो पूर्णतः अन्यायकारक, अव्यवहार्य व निषेधार्ह आहे. नगर परिषद हद्दीतील नागरिक आधीच महागाई, बेरोजगारी, वीजदरवाढ व विविध करभारामुळे त्रस्त असताना, पाणीपुरवठा हा मूलभूत हक्क असताना त्यावर अशी अमर्याद दरवाढ करणे म्हणजे नागरिकांच्या संयमाची जाणीवपूर्वक परीक्षा घेण्याचा प्रकार आहे. या बाबत नगरसेविका सुनीत...

लोणीत ग्रंथोत्सव 2025 आयोजन

Image
लोणीत ग्रंथोत्सव २०२५' चे आयोजन प्रतिनिधी।लोणी  ​ जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर व सिंधुताई एकनाथराव विखे पाटील  यांच्या संयुक्त विद्यमाने 'अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५' चे आयोजन  खासदार बाळासाहेब विखे पाटील बहुउद्देशीय सभागृह, पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, प्रवरानगर, ता. राहाता येथे शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६ व रविवार, दि. १ मार्च २०२६ रोजी करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अहिल्यानगर यांनी दिली आहे. ​'अहिल्यानगर ग्रंथोत्सव २०२५' चा उद्घाटन समारंभ विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते  २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता संपन्न होणार आहे. ​या कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार शिवाजी गर्जे, आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, आमदार अमोल खताळ, आमद...

मालक तो मालकच खरा मालक कोण

Image
मालक तो मालकच… ‘खरा मालक’  रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  महाराष्ट्राच्या राजकारणात ‘मालक’ हा शब्द केवळ मालकीहक्काचा नसतो—तो वलयाचा, वारशाचा आणि जनमानसावरच्या पकडीचा असतो. म्हणूनच आजचा प्रश्न कागदोपत्री नाही; तो भावनांचा आहे. शिवसेना नेमकी कोणाची? शिक्क्याची की स्मृतीची? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना ही फक्त एक पक्ष नव्हती; ती आक्रमक शैली, रस्त्यावर उतरलेला स्वाभिमान आणि ‘मातोश्री’केंद्रित निर्णयप्रक्रियेची राजकीय शाळा होती. त्या व्यक्तिमत्त्वाने पक्षाला जे वलय दिले, ते आजही राज्याच्या राजकारणावर सावली टाकते. म्हणूनच त्यांच्या जाण्यानंतरचा प्रश्न“पुढे काय?”—हा केवळ संघटनात्मक नव्हता; तो भावनिक होता. पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने प्रथम भाजपासोबत सत्ता घेतली, नंतर वेगळा मार्ग स्वीकारत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. ही चाल परंपरेपासून विचलन होती की काळाची गरज यावर मतभेद झाले; पण इतके मात्र खरे की सत्तेचे गणित बदलले. त्यानंतरचे बंड, सत्तांतर आणि ‘गुवाहाटी मार्गे’ रंगलेले राजकीय नाट्य यांनी शिवसेनेचे दोन...

संजलसंपदा विभागाचा विखे पॅटर्न

Image
जलसंपदा विभागाचे ‘रिपोर्ट कार्ड’ : पारदर्शकतेचा नवा पायंडा की राजकीय संदेश? रिपोर्ट कार्ड घाडगे न्यूज ॥ शिवाजी घाडगे ॥ राज्याच्या प्रशासनात एखाद्या विभागाने स्वतःहून वर्षभराच्या कामाचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध करून तो थेट मुख्यमंत्रीसमोर सादर करणे, ही बाब सामान्य नाही. जलसंपदा विभागाचे मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सादर केलेले ‘रिपोर्ट कार्ड’ हे केवळ कामगिरीचे दस्तऐवजीकरण नाही; तर तो प्रशासनातील उत्तरदायित्व, पारदर्शकता आणि राजकीय संदेश यांचा संगम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा अहवाल सादर होणे आणि त्यात कृष्णा–गोदावरी खोऱ्यातील प्रकल्प, नदीजोड योजना, अतिक्रमण हटाव, ‘लँड बँक’ निर्मिती यांसारख्या मुद्द्यांवर भर देण्यात येणे, यामागे स्पष्ट राजकीय आणि प्रशासकीय गणित दिसते. पाणी हा केवळ विकासाचा मुद्दा नसून तो ग्रामीण अर्थव्यवस्था, शेती, उद्योग आणि सामाजिक स्थैर्याशी थेट निगडित आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या कामगिरीचा थेट परिणाम राज्याच्या सर्वांगीण प्रगतीवर होणार आहे. ‘विकसित भारत २०४७’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेशी राज्यातील जलव्यव...

सिध्दार्थ बागुल अकस्मात निधन

Image
राहुरी फॅक्टरीतील तरुण विद्यार्थ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन दुखद ।घाडगे न्यूज  राहुरी फॅक्टरी परिसरातील २३ वर्षीय विद्यार्थी सिद्धार्थ सुरेश बागुल यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी दुर्दैवी निधन झाले. या आकस्मिक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सिद्धार्थ बागुल हे अमृतवाहीनी काॅलेज ऑफ फार्मसी  येथे औषध निर्माण शास्त्र (फार्मसी) शाखेत शिक्षण घेत होते. ते अभ्यासू, मनमिळावू आणि होतकरू विद्यार्थी म्हणून ओळखले जात. महाविद्यालयात असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली; मात्र उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सिद्धार्थ यांना पुढे एम.फार्म. करून उच्च शिक्षण घ्यायचे स्वप्न होते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळून त्यांना उभारी देण्याचा त्यांचा निर्धार होता. “मला नोकरी लागली की मोठा बंगला बांधेन आणि तुम्ही नोकरी करू नका,” असे ते वडिलांना प्रेमाने सांगत असत, अशी आठवण कुटुंबीयांनी व्यक्त केली. त्यांच्या या स्वप्नाळू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वामुळे मित्रपरिवार व नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली आहे. सिद्धार्थ हे आ...

महात्मा फुले भाजीपाला संशोधन केंद्राला पुरस्कार

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे भाजीपाला संशोधन केंद्र उत्कृष्ट केंद्र पुरस्काराने सन्मानित घाडगे न्यूज।प्रतिनिधी           भाजीपाला संशोधन संस्थेची 44 वी वार्षिक गट बैठक श्री कोंडा लक्ष्मण तेलंगणा राज्य फलोत्पादन विद्यापीठ, हैदराबाद येथे पार पडली. याप्रसंगी महात्मा फुले कृषी विद्यापीठतील उद्यान विद्या विभागांतर्गत  असलेल्या अखिल भारतीय समन्वित भाजीपाला पिके संशोधन प्रकल्पास उत्कृष्ट केंद्र पुरस्कार- 2025 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. उद्यानविद्या विभाग प्रमुख तथा वरिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉ. बी. टी. पाटील, कनिष्ठ भाजीपाला पैदासकार डॉ. शर्मिला शिंदे, कनिष्ठ रोगशास्त्रज्ञ प्रा. चिमाजी बाचकर, कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. शालिग्राम गांगुर्डे यांनी मान्यवरांच्या हस्ते सदरचा पुरस्कार स्वीकारला. हैदराबाद मधील राजेंद्रनगर येथील फलोत्पादन महाविद्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीप्रसंगी तेलंगणा उद्यानविद्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजीजी रेड्डी, तेलंगणा राज्याचे सचिव  सुरेश कुमार मोहन, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली येथील सहाय्यक महास...

नोकरी नाही लागली पण ती....

Image
नोकरी लागली नाही पण ती...... अभिषेक भोवले अत्याचार प्रकरण  रविवार विशेष @शिवाजी घाडगे  अलिकडे सर्वत्र  बेरोजगारी वाढली असून जो तो आपआपल्या परीने काही तरी काम धंदा शोधतो असे असले तरी नोकरी मिळणे साधी गोष्ट राहीली नाही आणि लागली तरी ती टिकेल याचा देखील भरोसा नाही नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर याच्यावर एका तरुणीने अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली असून ते फरार असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.  नोकरीचे आमिष, सत्तेचा माज आणि समाजमाध्यमांचा सापळा नगरचे माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्याविरोधात दाखल झालेल्या अत्याचाराच्या गुन्ह्याने केवळ एका व्यक्तीवर आरोप ठेवलेले नाहीत त्याने संपूर्ण राजकीय संस्कृतीच उघडी पाडली आहे. आरोपांची सत्यता न्यायालय ठरवेल; पण समाजाला छळणारा प्रश्न अधिक भेदक आहे नोकरीच्या आमिषावर सत्तेचा वापर करून किती दूरपर्यंत जाण्याची हिंमत काही जण करतात? आज शाळा भरती असो, जिल्हा परिषद असो किंवा अन्य नोकरभरती सर्व प्रक्रिया ऑनलाइन, टीईटी पात्रता, पोर्टल्स, पारदर्शकतेची भाषा… पण वास्तवात “ओळख” आणि “संपर्क” यांची सावली अजून...

डिजिटल क्रांती मुळे आम आदमी झाला पत्रकार

Image
डिजिटल माध्यम क्रांतीमुळे ‘आम आदमी’ झाला पत्रकार घाडगे न्यूज | प्रतिनिधी श्रीरामपूर येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकदिवसीय पत्रकार कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे आज सर्वसामान्य नागरिकही आपले म्हणणे थेट माध्यमांपर्यंत पोहोचवत असून ‘आम आदमी’ स्वतःच बातमीदार बनत आहे. मात्र या बदलाकडे आव्हान म्हणून न पाहता त्यात संधी शोधून पत्रकारांनी समाजातील प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडावी, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यशाळेला दैनिक लोकमतचे निवासी संपादक सुधीर लंके, सार्वमतचे संपादक अनंत पाटील, श्रीरामपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य प्रकाश कुलथे तसेच करण नवले, अनिल पांडे, महेश माळवे, राजेंद्र बोरसे, विकास अंत्रे, शिवाजी पवार, रवी भागवत आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांचे स्वागत शिवाजी पवार यांनी केले. विकास अंत्रे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला, तर प्रास्ताविक अशोक गाडेकर यांनी केले. डिजिटल युगातील पत्रकारितेची नवी वाटचाल संपादक सु...

लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरावे लागणे ही शोकांतिका

Image
 लोकप्रतिनिधींना रस्त्यावर उतरावे लागणे हीच सर्वात मोठी शोकांतिका  घाडगे न्यूज। प्रतिनिधी  राहुरीत घडलेल्या अलीकडील घटनांनी कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाला पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सार्वजनिक व्यासपीठावरून जिल्ह्यातील पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल उघड नाराजी व्यक्त केली होती व आता शुक्रवारी  खुद्द त्यांचे पुत्र माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांना वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरावे लागले ही केवळ योगायोगांची मालिका नाही; ती व्यवस्थेतील उघड पडलेली पोकळी आहे. लोकप्रतिनिधी हे धोरणे ठरविणारे आणि जनतेच्या समस्या मांडणारे असतात; प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रित करणे ही त्यांची भूमिका नसते. जेव्हा अशी वेळ येते, तेव्हा प्रश्न व्यक्तींचा राहत नाहीतो संपूर्ण व्यवस्थेचा बनतो. पोलिस दलाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे सर्वाना माहीत आहे  असे असले तरी नियोजनात त्रुटी आहेत का? की जबाबदारीची साखळी सैलावली आहे? या सर्व प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधणे गरजेचे आहे. राहुरीत वर्षा पुर्वी तालमीत शि...

देशी गाय सुधार प्रकल्पाला पुरस्कार

Image
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा पुरस्कार राहुरी ।  परळी वैजनाथ येथे आयोजित  महा पशुधन एक्सपो या प्रदर्शनात  कृषी महाविद्यालय पुणे येथील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने शुद्ध देशी गोवंश सन्मान  पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.  महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राने देशी गोवंश जतन, संवर्धन, संशोधन, प्रशिक्षण व शेतकरी मार्गदर्शन या क्षेत्रात सातत्याने केलेल्या विशेष योगदानाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सुनील सूर्यवंशी व  नेरकर हे गोसेवा आयोगाचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते.        देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने व सह-शास्त्रज्ञ डॉ. सुजित भालेराव यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराबद्दल  महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगु...

खासदार प्रियंका गांधी यांना आर्शिवाद....

Image
खासदार प्रियंका गांधी-वढेरा यांना पंतप्रधान होण्याचा बाबाचा आर्शिवाद  घाडगे न्यूज स्पेशल।शिवाजी घाडगे। आशीर्वाद, प्रतिमा आणि वास्तवाची राजकारणातली कसोटी कामाख्या मंदिराच्या पायऱ्यांवर दिलेला आशीर्वाद आणि दिल्लीच्या सत्तेचा दरवाजा — या दोन्हींत किती अंतर आहे? प्रियंका गांधी- वढेरा  यांना महाकाल बाबा आणि भैरवनाथ बाबांनी पंतप्रधानपदासाठी आशीर्वाद दिल्याची चर्चा रंगली, आणि त्या क्षणी भारतीय राजकारणात प्रतीकांची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली. पण प्रश्न असा आहे की, आशीर्वादाने नेतृत्व घडते की नेतृत्वाच्या क्षमतेने आशीर्वाद अर्थपूर्ण ठरतो? प्रियंका गांधी या करिष्माई वक्तृत्व, ठाम देहबोली आणि जनसंपर्काच्या कौशल्यामुळे चर्चेत राहतात. अनेकांना त्यांच्यात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची छबी दिसते. परंतु केवळ साम्य पुरेसे नसते; त्या काळाचा राजकीय संदर्भ, पक्षाची ताकद आणि जनमानसाचा विश्वास हे घटक वेगळे असतात. इंदिरा गांधींना लाभलेली राजकीय पार्श्वभूमी आणि आजची काँग्रेसची परिस्थिती यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. खासदार राहुल गांधी यांच्याबाबत विरोधकांनी “पप्पू” अशी प्रतिमा उभी क...

महात्मा फुले कृषी विद्यापीठात डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर संभागृह

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन; ५८ वर्षांनंतर नावाचा सन्मान      घाडगे न्यूज ॥शिवाजी घाडगे ॥           महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुसज्ज सभागृह उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन बुधवारी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांचे नावाचे संभागृह या विद्यापीठाला लाभण्यासाठी तब्बल ५८ वर्षे प्रतीक्षा करावी लागली, ही बाब खेदजनकच म्हणावी लागेल. महात्मा फुले यांना आदर्श मानणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा सन्मान करण्यास एवढा विलंब का झाला, हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. उशिरा का होईना, हा निर्णय झाला; मात्र तो अधिक आधी व्हायला हवा होता, हेही तितकेच सत्य आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानसभेच्या प्रचारसभेदरम्यान या परिसरात फळ प्रक्रिया उद्योग उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती. फळांपासून ज्यूससारखी उत्पादने तयार केल्यास शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकतो आणि स्थानिक अर्थचक्रालाही चालना मिळू शकते. त्य...

माझी वसुधरात अहिल्यानगर जिल्हा अग्रेसर

Image
माझी वसुंधरा अभियानात अहिल्यानगर जिल्हा परिषद नाशिक विभागात अव्वल !  तीन ग्रामपंचायतींना दीड कोटींचे पुरस्कार जाहीर प्रतिनिधी ॥  ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने पुन्हा एकदा बाजी मारली असून नाशिक विभागात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना एकूण एक कोटी पन्नास लाख रुपयांचे पुरस्कार मिळाले आहेत.  या अभियानात जिल्हा परिषदेने सलग पाचव्यांदा पुरस्कार मिळवला आहे. राज्य शासनाच्या वतीने १ जून २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील २७ हजार ८९५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. अभियानात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना नाशिक विभागस्तरावर प्रथम पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये तीन हजार ते पाच हजार लोकसंख्या गटात शेवगाव तालुक्यातील आव्हाने बुद्रुक, दीड हजार ते अडीच हजार लोकसंख्या गटात अकोले तालुक्यातील लहित खुर्द व दीड हजारपेक्षा कमी लोकसंख्या गटात श्रीरा...

अहिल्यानगर जिल्ह्यात दोन नवीन तहसील कार्यालय

Image
महाराष्ट्र शासनाचा निर्णय : अहिल्यानगर जिल्हात दोन नवीन तहसील कार्यालयांना मंजुरी.        बेक्रींग । घाडगे न्यूज । अहिल्यानगर जिल्ह्यात प्रशासनिक सोयीसुविधा वाढविण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत दोन नवीन तहसील कार्यालयांना मंजुरी दिली आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव आणि अकोले तालुक्यातील राजूर येथे स्वतंत्र तहसील कार्यालय सुरू होणार असून, यामुळे स्थानिक नागरिकांना महसूल व प्रशासनाशी संबंधित कामांसाठी होणारी धावपळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. घोडेगाव येथे नवीन तहसील कार्यालय नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे तहसील कार्यालय सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना जमीन, महसूल, उत्पन्न दाखले, वारस नोंदी आदी कामांसाठी तालुक्याच्या मुख्यालयावर जाण्याची गरज कमी होईल. स्थानिक पातळीवर प्रशासन उपलब्ध झाल्याने विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. राजूरला तहसील कार्यालय; राजकीय समीकरणांची चर्चा अकोले तालुक्यातील राजूर येथेही स्वतंत्र तहसील कार्यालय मंजूर झाले आहे. या निर...

शेतात राबविण्यात महिला अग्रगण्य कृषी मंत्री दत्ता भरणे

Image
शेतीच्या कामात महिलाचा सहभाग अग्रण्य   कृषि मंत्री दत्तात्रय भरणे घाडगे न्यूज।प्रतिनिधी  राज्यातील सर्व कृषि विद्यापीठांचे संशोधनाचे काम उत्तम असून. राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे काम  दीपस्तंभासारखे आहे.  शेतीतात राबणारा मध्ये महिला भगिनी अग्रगण्य आहेत. या महिलांचे शेतीमधील श्रम कमी करण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. शेतकर्यांची प्रगती ही कृषि विद्यापीठांनी विकसीत केलेल्या वाणांमुळेच आहे. कृषि विभागांतर्गत आपण 50 हून अधिक शेतकरीभिमुख योजना राबवत आहोत. शेतकर्यांची काळजी घेणे व त्यांचे हित जपणे हे आमचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन कृषि मंत्री तथा महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे प्रतिकुलपती ना. दत्तात्रय भरणे यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठामध्ये कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व आत्मा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उमेद अभियान, जिल्हा परिषद अहिल्यानगर, महाबीज, नाबार्ड, पाणी फाऊंडेशन आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्याने कृषि विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरात फुले कृषि तंत्रज्ञान घरो घरी, समृद्धी येईल गावो गा...

नसिफा अब्दुल सत्तार यांचे निधन

Image
नफिसा अब्दुल सत्तार बेगम यांचे दुःखद निधन सिल्लोडच्या माजी नगराध्यक्षा तथा सिल्लोडचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम पत्न  होत . त्यांच्या निधनाने सिल्लोड शहरासह राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. नसिफा सत्तार  केवळ आमदारांच्या पत्नी म्हणूनच नव्हे, तर सिल्लोडच्या राजकारणातील एक सक्रिय व प्रभावी नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. सिल्लोड नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा म्हणून त्यांनी शहराच्या विकासासाठी उल्लेखनीय काम केले. त्यांच्या कार्यकाळात विविध विकासकामांना चालना मिळाली होती. त्यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे मृत्यूमागील कारणांविषयी स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. या अचानक घडलेल्या घटनेमुळे सत्तार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीयांवर मोठा मानसिक आघात झाला आहे. उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सिल्लोड शहराने एक प्रभावी नेतृत्व गमावले आहे.

राहुरी पोलीस ठाण्यात गिते यांच्या नियुक्तीचे गित सुरुच....

Image
राहुरी पोलिस ठाण्यात प्रल्हाद गिते यांच्या बदलीचे गित सुरुच   चर्चा ।शिवाजी घाडगे  राहुरी पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांची सोमवारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी नियुक्ती केली. मात्र ही बदली नेमकी नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे की सुरू असलेल्या चौकशीदरम्यान दिलासा, असा सवाल उपस्थित होत आहे. राहुरीत अवघ्या आठ दिवसांपूर्वी नगरहून आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांना सोनई पोलीस ठाण्यातील खातेनिहाय चौकशीमुळे निलंबित करण्यात आले. त्यानंतर गिते यांची राहुरीत एंट्री झाली. परंतु गिते यांच्याविरोधातही चौकशीचे सावट असल्याने ते राहुरीत किती दिवस टिकणार, याबाबत शहरात चर्चांना उधाण आले आहे. नगर तालुक्यातील गंभीर आरोप नगर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी असताना गिते यांनी खुनाचे प्रकरण दडपल्याचा गंभीर आरोप आहे. अरणगाव (ता. अहिल्यानगर) येथील मिठू कार्तिक दत्त (वय ४२) यांना ६ मार्च २०२५ रोजी निघृण मारहाण झाली. उपचारादरम्यान २३ मार्च रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला. इतक्या गंभीर घटनेनंतरही सुरुवातीला केवळ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल...

वैतरणाचे अतिरिक्त पाणी आता मुकणे धरणात !

Image
वैतरणा धरणाचे अतिरिक्त पाणी आता मुकणे धरणात घाडगे न्यूज स्पेशल रिपोर्ट ॥ शिवाजी घाडगे ॥ अप्पर वैतरणा धरणातून मुंबईला पाणीपुरवठा केला जातो. मात्र दरवर्षी काही प्रमाणात अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे थेट अरबी समुद्रात वाहून जाते. हेच पाणी आता मुकणे धरणात वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील इंजिनिअर प्रा. सतीश राऊत तसेच प्रहारचे अप्पासाहेब ढुस यांनी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला. वैतरणा बॅकवॉटरमधील अतिरिक्त पाणी उपयोगात आणल्यास नगर जिल्ह्यातील मुळा व भंडारदरा धरणांवरचा ताण कमी होईल आणि जायकवाडीला द्यावे लागणारे समन्वयी पाणी (५ टीएमसी) वाचू शकेल, असा त्यांचा ठाम आग्रह होता. या प्रकल्पाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर्थिक मान्यता देत निधी उपलब्ध करून दिला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन  यांचेही या निर्णयामागे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. अलीकडेच अप्पर वैतरणा व मुकणे धरण परिसराची प्रत्यक्ष पाहणी रविवारी करण्यात आली. ‘दोन...

मंत्रालय की लाचालय सांगाना न्याय कोठे मागायचा?

Image
 मंत्रालय की लाचालय सांगाना न्याय        कुठे मागायचा ? घाडगे न्यूज स्पेशल रिपोर्ट   ॥ शिवाजी घाडगे ॥ राज्यकारभाराचा किल्ला… सत्तेचे केंद्र… जनतेच्या आशा-अपेक्षांचे प्रतीक  तेच मंत्रालय. आणि त्याच मंत्रालयात, मंत्र्यांच्या कार्यालयातच लाच घेताना कर्मचारी रंगेहात पकडला जातो! ही केवळ एक गुन्हेगारी घटना नाही; हा व्यवस्थेवरचा सार्वजनिक अविश्वासाचा शिक्का आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयावर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने छापा टाकून कार्यालय सील केले, ही बातमी धक्कादायक आहे. परवाना नूतनीकरणासाठी ५० हजारांची मागणी, त्यातील ३५ हजारांची रंगेहात वसुली  आणि तेही मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावर! म्हणजे भ्रष्टाचाराने आता दरवाजे तोडून आत शिरण्याची गरजच उरलेली नाही; तो खुर्च्यांवर बसून व्यवहार करत आहे.  प्रश्न फक्त एका लिपिकाचा आहे का? प्रत्येक वेळी सूत्र एकच असते — “कर्मचारी दोषी आहे, मंत्री अनभिज्ञ आहेत.” पण प्रश्न असा आहे की, मंत्र्यांच्या दालनात होणाऱ्या व्यवहारांची जबाबदारी कोणाची? खाजगी सचिवांचे नाव पुढे ये...

नविन तुती लागवडी साठी अर्ज करा

Image
नवीन तुती लागवडीसाठी ५ मार्चपर्यंत नोंदणी करावी – संदीप आगवणे घाडगे न्यूज | प्रतिनिधी रेशीम उद्योगासाठी आवश्यक असलेल्या तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महारेशीम अभियान २०२६ अंतर्गत ५ मार्च २०२६ पर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी संदीप आगवणे यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी पर्यावरणपूरक व शेतीपूरक रेशीम उद्योग सुरू करून आर्थिक प्रगती साधावी, असे त्यांनी सांगितले. यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यात तुती लागवड करून रेशीम कोष निर्मितीद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळू शकतो. रेशीम उद्योगासाठी राज्यात अनुकूल वातावरण असून कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून रेशीम उत्पादनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रेशीम कोष उत्पादन होत असून अहिल्यानगर, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बारामती व नागपूर येथे कोष उत्पादनाची कामे सुरू आहेत. रेशीम उत्पादनांना दिवसेंदिवस वाढती मागणी असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी शासनामार्फत विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा रेशीम ...

नरेश आरोरा विषयी आरडाओरड

Image
नरेश आरोरा याच्या विषयी आरडाओरड  चर्चा।शिवाजी घाडगे  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आपघातात आकाली निधनानंतर राजकीय सल्लागार नरेश आरोरा याच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे राष्ट्रवादी दादा गटाच कॅपियन हा अरोरा करीत होता गुलाबी रंग हा यांनीच आणला आता या कंपनीला पुढे मुदत वाढ देण्यात येईल की नाही याबद्दल शंका उपस्थित केल्या जात असून स्थानिक व परप्रांतीय असा वाद निर्माण केला जातोय? तसे राजकारणात काही व्यक्ती निवडणूक लढवत नाहीत भाषणांच्या सभा घेत नाहीत,  तरी त्यांच्या नावाभोवती निर्माण होणारा गदारोळ अनेक उमेदवारांपेक्षा मोठा असतो. नरेश ओरोरा हे त्यापैकीच एक नाव. साधारण 2024 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात नरेश अरोरा यांचं नाव घेतलं जाऊ लागलं. विधानसभा निवडणुकीच्या काही काळ आधी नरेश अरोरा यांची 'डिझाइनबॉक्स' ही कंपनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडली गेली.  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याबाबत सुरू असलेली आरडाओरड ही केवळ व्यक्तीविषयी नाही, तर ती राजकीय सल्लागारांच्या वाढत्या प्रभावाविषयी आहे. आरडाओरडीचे नेमके कारण काय? ओरोरा हे व...