ऑनलाईन विठ्ठल दर्शन बुकींग पास वेळ वाढवली
श्री विठ्ठल रुक्मिणी ऑनलाइन दर्शन पास बुकींगच्या संख्येत व वेळेत वाढ श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना ऑनलाईन पध्दतीने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समिती मार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून निशुल्क दर्शन पास बुकिंगची सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध असून, जास्तीत जास्त भाविकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचे सुखकर पददर्शन घेता यावे यासाठी ऑनलाइन दर्शन पास बुकींग संख्येत व वेळेत वाढ करण्यात आली असून या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर च्या अधिकृत संकेतस्थळावरून दर्शन पास बुकिंगची सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करून, भक्तांना त्यांच्या इच्छित दिवशी आणि वेळेस मंदिरात पदस्पर्शदर्शन घेता येते, ज्यामुळे रांगेत जास्त वेळ उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. सण, यात्रा, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून स.7.00 ते रा.9.00 या वेळेत एकूण 6 स्लॉट निश्चित करून, प्रति स्लॉट 600 प्रमाणे दैनंदिन 3600 पा...