छत्रपती शिवाजी महाराज विटबखोर माहीती देणाऱ्यास 11 हजाराचा इनाम
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्याचा शोध सुरू; माहिती देणाऱ्यास ११ हजारांचे बक्षीस घाडगे न्यूज।प्रतिनिधी राहुरी शहरातील बुवासिंग बाबा तालीम परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी राहुरी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू ठेवली आहे. या प्रकरणातील आरोपीबाबत खात्रीलायक माहिती देऊन त्याला पकडण्यास मदत करणाऱ्या व्यक्तीस ११ हजार रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे राहुरी शहरासह परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नागरिकांच्या मनात असलेला आदर लक्षात घेता या घटनेला अत्यंत गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते. त्यानंतर राहुरी पोलिसांनी विविध स्तरांवर तपास सुरू केला. मात्र, दीड वर्षांचा कालावधी उलटूनही विटंबना करणारा आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर राहुरी पोलिसांनी नागरिकांचे सहकार्य मिळावे यासाठी आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास ११ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आरोपीची ओळख, त्याच्या ...