टाळिमिया गावाला थेट मुळा धरणातून पाईप लाईन व्दारे पाणी द्या
ग्रामस्थ म्हणतात थेट मुळा धरणातून पाईप व्दारे पाणी द्या अण आ. कानडे म्हणतात ठेकेदारावर कारवाई करा टाकळीमियाँ च्या पाणी प्रश्नावर आ. लहू कानडें यांनी आपली राजकीय पोळी भाजू नये -सिद्धांत सगळगिळे. ............................................. टाकळीमियाँ गावाला मुसळवाडी तलावातून पाणी पुरवठा होतो . त्या तलावातील पाणी अतिशय दुर्गंधीयुक्त व खराब वास येणारे व पिवळे असून पिण्यास योग्य नाही तसेच आरोग्यास हानिकारक असून आम्हाला मुळा धरणातून स्वतंत्र पाईप लाईन करून आमच्या हक्काचे पाणी आम्हाला देण्याची मागणी काही दिवसांपूर्वी आ. लहू कानडे यांचेकडे नागरिकांनी समक्ष केली होती.पण त्यांनी विधानसभेत ठेकेदार व अधिकारी यांच्या चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे. या प्रकाराने टाकळीमियाँ च्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न सुटणार आहे का? आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी आपण टाकळीमियाँ करांच्या जीविताशी खेळत आहात. असा आरोप रिपाई चे जिल्हा सरचिटणीस सिद्धांत सगळगिळे यांनी केला आहे. तसेच त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, टाकळ...