Posts

Showing posts with the label डिजिटल थसमृध्दीचा ठेवा

जिल्हा ग्रंथालय अधधिकारी अशोक गाडेकर यांची नवी मुंबईला बदली

Image
वाचन संस्कृतीच्या जतनासाठी महत्त्वपूर्ण योगदान; डिजिटल ग्रंथालय, आधुनिक सुविधा विकासकामांची ठळक छाप निर्माण करणारे अशोक गाडेकर यांची नवी मुंबईला बदली घाडगे न्यूज। प्रतिनिधी  अहिल्यानगर जिल्ह्यातील सार्वजनिक ग्रंथालय चळवळीला आधुनिकतेची जोड देत वाचन संस्कृतीला नवी उभारी देणारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर यांची लोकहित व प्रशासकीय कारणास्तव सहायक ग्रंथालय संचालक, कोकण भवन, नवी मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या बदलीमुळे जिल्ह्यातील ग्रंथालय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कार्याचा ठसा दीर्घकाळ कायम राहील, अशी भावना ग्रंथालय कर्मचारी, ग्रंथपाल आणि वाचनप्रेमींनी व्यक्त केली आहे. सन २०१९ मध्ये जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणून अहिल्यानगर येथे पदभार स्वीकारल्यानंतर गाडेकर यांनी ग्रंथालय व्यवस्थापनात केवळ प्रशासकीय अधिकारी म्हणून नव्हे, तर ग्रंथालय चळवळीचे अभ्यासू आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून काम केले. नाशिक येथील सार्वजनिक ग्रंथालयातून सेवेला सुरुवात केल्याने कर्मचारी, ग्रंथपाल आणि संस्थांच्या अडचणी त्यांना जवळून माहिती होत्या. त्यामुळे त्यांनी शिस्त, पार...